एक्स्प्लोर

Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?

Mahayuti CM Face: अमित शाह यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले होते. अमित शाहांची एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांसोबत बैठक

मुंबई:  राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीत पहिलीवहिली प्रचारसभा घेताना अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिले होते. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) विजयी करणं, ही महाराष्ट्राची इच्छा आहे, असं वक्तव्य अमित शाहांनी (Amit Shah) शुक्रवारी सांगलीतल्या सभेत केलं होते. मात्र, महायुतीच्या इतर दोन पार्टनर्सनी म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अमित शाहांच्या सूरात सूर मिसळले नव्हते. आणि आता अमित शाहांनी मुख्यमंत्रिपदाबाबत थोडासा वेगळा सूर आळवल्या दिसून आले. निकालानंतर मुख्यमंत्रिपदादाबाबत तिन्ही पक्ष बसून ठरवू अशी भूमिका अमित शाहांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याबाबतच्या भूमिकेत अचानक बदल का केला, असावा याची चर्चा रंगली होती.

दरम्यान, रविवारी मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये रविवारी अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. दुपारी साधारण  12.15 च्या सुमाराला ही बैठक सुरू झाली आणि 1 च्या सुमाराला संपली. बैठकीत सुरूवातीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवार यांना बैठकीत का सामील करुन घेतले नाही, असे प्रश्न उपस्थित झाले. मात्र, त्यानंतर अजित पवार बैठकीत सामील झाले. 

अमित शाहांच्या तिन्ही नेत्यांना महत्त्वाच्या सूचना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चौघांमध्ये 15 ते 20 मिनिटं  बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेतला. विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, अशी सूचना अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची आज मालवणीत सभा

देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मुंबईतील मालवणी परिसरात सभा होणार आहे. याठिकाणी भाजपचे विनोद शेलार निवडणुकीच्या रिंगणात असून हा परिसर मुस्लीमबहुल आहे. राजे शहाजी मैदानावर आज रात्री 9 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोखंडवालामध्ये वर्सोवा आणि गोरेगाव विधानसभेसाठी रात्री 8 वाजता फडणवीसांची सभा होणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मालाड मालवणीत रोहिंग्या आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीवर भाजपकडून सातत्याने टीका केली जाते. धर्मांतर कायद्यासंदर्भात घोषणेनंतर मालाडमध्ये फडणवीसांच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ‘बटेंगे कटेंगे’वर फडणवीस पुन्हा बोलणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

नागपुरात फडणवीसांना हरवण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला, काँग्रेसच्या उमेदवाराकडून प्रचारात तब्बल चौपट खर्च!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget