Amalner Vidhan Sabha Result: अमळनेरमध्ये महायुतीच्या अनिल पाटलांनी केलं संधीचं सोनं! मविआच्या हाती निराशा
Amalner Vidhan Sabha Constituency: अमळनेरमध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि जनता पक्षाला जनतेने वारंवार संधी दिली आहे. यंदा महाविकास आघाडीच्या हाती निराशा लागली आहे.
Amalner Vidhan Sabha Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघाची (Amalner Vidhan Sabha Constituency) राज्यात सर्वाधिक चर्चा आहे. महाराष्ट्रातील अमळनेर विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 15 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून महायुतीचे अनिल पाटील विजयी झालेत, तर इथेही महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला.
अनिल पाटलांनी केलं संधीचं सोनं
या मतदारसंघात (Mahayuti) महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसने अनिल शिंदे (Anil Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर भाजपचे बंडखोर नेते अपक्ष शिरीष चौधरी रिंगणात असतील. राज्यातील इतर जागांच्या तुलनेत या जागेवरील जनतेने सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि जनता पक्षाला वारंवार संधी दिली आहे. त्यानंतर 1995 ते 2004 पर्यंत येथे भाजपची सत्ता होती. यानंतर अपक्ष उमेदवारांनीही या जागेवर दोनदा विजय मिळवला आहे. सध्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांच्याकडे आहे.
2019 निवडणुकीत काय झाले?
संपूर्ण खान्देशमध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. कारण 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनिल पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात होते. त्यांच्यासमोर शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. यावेळी शिरीष चौधरी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. या विधानसभा निवडणुकीत लोकांनी राष्ट्रवादीला साथ दिली. राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांना एकूण 93,757 मते मिळाली तर भाजपच्या तिकीटावर लढलेल्या शिरीष दादांना एकूण 85,163 मते मिळाली. भाजपचे शिरीष दादा एकूण 8,594 मतांनी पराभूत झाले आणि विजय राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांना मिळाला.
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.
हेही वाचा>
Jalgaon District Vidhan Sabha Election: जळगावातील 11 विधानसभा मतदारसंघांत कोण-कोणाला आव्हान देणार? कोणत्या पक्षाचं पारडं जड ठरणार?