एक्स्प्लोर

Solapur News: विधानसभेला मित्रपक्षांनी पाठीत केला वार! स्थानिक स्वराज्य संस्थावेळी मविआ नको, सोलापुरातील ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांची भूमिका

Solapur News: सोलापुरातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

सोलापूर: राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकासआघाडी नको अशी भूमिका शिवसेना ठाकरे गट घेत असल्याच्या चर्चा काही दिवस सुरू होत्या. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांनीच पाठीत वार केला आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी नको. सोलापुरातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव झाल्यानंतर जिल्हाप्रमुख अजय दासरी आक्रमक झाले आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यावर शिवसेना ठाकरे गट आग्रही असल्याचं देखील दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः खासदार प्रणिती शिंदे यांना आवाहन करूनही त्यांनी आघाडीधर्म पाळला नाही. त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्या असा अहवाल आम्ही पक्षप्रमुखांना दिला आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आमच्या उमेदवाराचे काम केले नाही असा आमचा देखील आरोप  आहे, त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

प्रणिती शिंदेंनी आघाडीधर्म पाळला नाही

सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा उमेदवार देऊनही प्रणिती शिंदे यांनी काडादींना पाठिंबा दिला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या होत्या. सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आघाडीधर्म आम्ही पाळला. आम्ही शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मागे घेतला. दिलीप माने यांनीही आपला एबी फॉर्म मागे घेतला. पण आम्हाला इथे फ्रेंडली फाईट हवी होती, पण ती होऊ शकली नाही. त्यावेळी काहीतरी गैरसमज झाला. संजय राऊत यांनी यादीत काही बदल होईल असं सांगितलं होतं. त्यामुळं आम्हाला वाटलं होतं की सोलापूर दक्षिणची जागा ठाकरे गटानं चुकून जाहीर केलीय. पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं आज आम्ही काडादी यांच्या सोबत आहोत. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्यात, त्यामुळं जो जितेगा वही सिकंदर होगा. आम्ही एबी फॉर्म नाही दिला कारण काँग्रेसला आघाडी धर्म पाळायचा होता, असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.

त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी नको. सोलापुरातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

व्हिडीओ

Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget