एक्स्प्लोर
Advertisement
Akola Municipal Corporation : अकोला शिवसेना पक्षसंघटनेवर पुन्हा आमदार नितीन देशमुखांचं वर्चस्व
Akola : पश्चिम विदर्भातल्या सेनेतील पक्षांतर्गत लढाई थांबविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थर्ड अंपारयच्या भूमिकेत आले आहेत. यातूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सेनेच्या पक्षांतर्गत सामन्यात सध्याचे जिल्हाप्रमुख आणि आमदार नितीन देशमुखांना 'नॉट आऊट' ठरवल्याने त्यांचेच वर्चस्व याठिकाणी आहे.
Akola Municipal Corporation : पश्चिम विदर्भातल्या सेनेतील पक्षांतर्गत लढाई थांबविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: थर्ड अंपारयच्या भूमिकेत आले आहेत. यातूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सेनेच्या पक्षांतर्गत सामन्यात सध्याचे जिल्हाप्रमुख आणि आमदार नितीन देशमुखांना 'नॉट आऊट' ठरवलं आहे. तर विधान परिषदेतील पराभवासाठी नितीन देशमुखांच्या 'विकेट'साठी 'अपिल' करणारे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया स्वत:च 'आऊट' झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अकोल्यात पक्षसंघटनेच्या 'कॅप्टन्सी'चा निर्णय आमदार नितीन देशमुखांच्या बाजूने दिल्याने त्यांनी हा निर्णायक 'सामना' जिंकल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात आहे.
अकोला शिवसनेची सर्व सुत्रं नितीन देशमुखांच्या हातात
अकोल्यात आता पहिल्यांदाच दोन जिल्हाप्रमुख असणार आहेत. अकोला जिल्हा शिवसेनेवर परत आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांचंच वर्चस्व निर्माण झालं आहे. पक्षाने आमदार नितीन देशमुखांसह त्यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषद गटनेते गोपाल दातकरांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. आमदार आणि सध्याचे जिल्हाप्रमुख नितिन देशमुख यांची पुनर्नियुक्ती करतांना त्यांच्याकडे बाळापुर आणि मुर्तिजापूर मतदार संघाची जबाबदारी असणार आहे. तर गोपाल दातकर यांच्याकडे अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि अकोट मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे. पक्षाने दोन जिल्हाप्रमुख देण्याचं ठरविल्यानंतर जिल्ह्यातील देशमुख आणि बाजोरिया गटांची या पदांसाठी रस्सीखेच सुरू होती. बाजोरिया गटाने आपल्याला किमान एक जिल्हाप्रमुख पद मिळावी यासाठी ताकद लावली होती. मात्र, पक्षानं दोन्ही जिल्हाप्रमुखपदं देशमुख गटाला देत बाजोरिया गटाचा भ्रमनिरास केला आहे.
अकोला शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर
विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे सलग तीन वेळा आमदार असलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी झाले होते. सेनेच्या या पराभवानंतर शिवसेनेत आरोप प्रत्यारोप झाले. शिवसेनेतील घरभेद्यांनीच आपला पराभव घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप गोपीकिशन बाजोरियांनी केला होता. तर बाजोरियांचे समर्थक सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी या पराभवाला थेट आमदार नितीन देशमुख जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. भाजपकडून पैसे घेऊन देशमुखांनीच बाजोरियांचा पराभव घडवून आणल्याचा गंभीर आरोप पिंजरकरांनी केला होता. तर श्रीरंग पिंजरकरांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार देशमुखांवर खंडणीखोरीचे आरोप केले होते. या आरोपानंतर शिवसंदेश यात्रेदरम्यान निरिक्षक म्हणून आलेल्या खासदार हेमंत पाटलांनी दोन्ही गटांत दिलजमाईचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यानंतरही दोन्ही गटांत जिल्हाप्रमुख पदावरून शह-काटशहाचं राजकारण सुरू होतं. अखेर यात देशमुख गटानं बाजी मारत बाजोरिया गटाला पहिल्या डावात अस्मान दाखवलं आहे.
आरोप करणाऱ्या सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांना नारळ
बाजोरियांच्या पराभवानंतर सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी सातत्यानं माजी संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार नितीन देशमुख, संजय रायमुलकर आणि संजय गायकवाडांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित देशमुखांवर खंडणीखोरीचे आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, शिवसेना नेतृत्वाने पिंजरकरांची कोणतीही दखल न घेता त्यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. आता सेवकराम ताथोड हे शिवसेनेचे नवे सहसंपर्कप्रमुख असणार आहेत. त्यामुळे पिंजरकरांच्या आरोपांना केराची टोपली दाखवत पक्षनेतृत्वाने देशमुखांकडे संघटनेचं नेतृत्व देत एकप्रकारे क्लीनचीट दिली आहे.
आता अकोला शहरप्रमुख पदासाठी होणार दोन्ही गटांत संघर्ष
या नियुक्त्यानंतर आता शहरातील नेतृत्वासाठी दोन्ही गटाकडून ताकद लावली जाणार आहे. कारण, लगेच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची सूत्र आपल्याकडे असावीत, यासाठी दोन्ही गट प्रयत्न करणार आहे. अकोला शहरप्रमुख पदासाठी आमदार नितीन देशमुखांकडून सध्याचे अकोला पश्चिमचे शहरप्रमुख राजेश मिश्रांसह राहूल कराळेंचं नाव पुढे केलं जाण्याची शक्यता आहे. यासोबतच बाजोरिया गटाकडून सध्याचे अकोला पुर्वचे शहरप्रमुख अतुल पवनीकरांसह योगेश बुंदेले यांचं नाव पुढं केलं जाणार आहे. दोन्ही जिल्हाप्रमुख पदं देशमुख गटाला दिल्यानंतर किमान अकोला शहराची जबाबदारी देण्यासाठी बाजोरिया गट पक्षाकडे आग्रह धरणार असण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement