(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : ठरलं! अजित पवार बारामती विधानसभेतूनच लढणार, एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांची माहिती
Maharashtra Assembly Election : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ फिक्स झाला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत (Mahayuti) अधिकच्या जागा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) चांगलाच कस लावावा लागत असल्याच्या चर्चा आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच (Baramati Assembly) लढणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी खात्रीशीर माहिती दिली आहे.
सध्या अजित पवार विविध मतदारसंघात लढण्यासंदर्भात आढावा घेत असल्याची चर्चा तथ्यहीन असल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अजित पवार आपल्या पारंपारिक मतदारसंघ असलेल्या बारामती विधानसभेतूनच लढणार यावर आता जवळ जवळ शिक्कामोर्तब झाल्याचे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार बारामती विधानसभेतूनच लढणार!
दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार फटका दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा रोल राहिला आहे तो शरद पवार यांचा. त्यामुळेच सध्या त्यांच्याकडे येणाऱ्यांची इच्छा असणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. त्यातून शरद पवारांना भेटणासाठी येणाऱ्यांचीही रांग आता वाढत चालल्याचं दिसतंय. म्हणूनच नेहमी बेरजेचं राजकारण करणारे नेते अशी ख्याती असणारे शरद पवार विधानसभेला काय खेळी करणार? याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. तर दुसरीकडे अजित पवार यांना एका पाठोपाठ एक धक्के शरद पवार देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अलिकडे अजित पवार हे काहीशी सावध भूमिका तर घेत नाहीये ना? त्यातूनच अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढत नाहीये ना? असे अनेक प्रश्न या निमित्याने राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या