एक्स्प्लोर
Advertisement
पवारांची तिसरी पिढी लोकसभा लढवण्याची शक्यता 'मावळ'ली, पार्थ-रोहित पवार रिंगणात नाहीत
पार्थ पवार, रोहित पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणीही लोकसभा निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं. आपण मात्र निवडणूक लढवणार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं
पुणे : शरद पवारांची तिसरी पिढी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पार्थ पवार किंवा रोहित पवार यांच्यापैकी कोणीही येत्या निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. इतकंच काय, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणार नाहीत.
पवार कुटुंबातील चार सदस्य लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द पवारांनीच या शक्यतांवर काट मारली. पार्थ पवार, रोहित पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणीही लोकसभा निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं पवारांनी सांगितलं. आपण मात्र निवडणूक लढवणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.
"आमच्या घरातील मुलांनी राजकारणात येऊ नये, असं आपलं वैयक्तिक मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं होतं. 'एबीपी माझा'च्या #माझाट्विटरकट्टा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार नुकतंच राजकारणात सक्रिय झाले होते. ते मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. तर, अजित पवार शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत होते. मात्र या शक्यता आता मावळल्या आहेत.
रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. बारामती अॅग्रो लिमिटेडचे ते सीईओ असून भारतीय साखर कारखान्यांच्या असोसिएशन (इस्मा)चे ते अध्यक्ष आहेत. रोहित हे राजेंद्र पवारांचे पुत्र, म्हणजेच शरद पवारांचे नातू, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे.
काही दिवसांपूर्वी रोहित यांनी अहमदनगरमधल्या प्रवरानगरमधील विखे पाटील सहकारी कारखान्याला भेट दिली. यावेळी सुजय विखे पाटील आणि रोहित एकत्र दिसले होते. पवार-विखे पाटील कुटुंबात वैर असताना तिसऱ्या पिढीतील दोन तरुण नेते एकत्र आल्याने या दोन कुटुंबांतील मैत्रीचा नवीन अध्याय लिहिणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या.
सुप्रिया सुळे आणि शरद पवारच आता लोकसभा लढवणार असल्याचं समजतं. सुप्रिया सुळे या गेल्या वेळी लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरणाऱ्या पवार कुटुंबातील एकमेव सदस्य होत्या. बारामतीच्या विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळे पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. तर शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत.
बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांनी 2009 साली सोलापुरातील माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्याआधी, जवळपास दोन दशकं राखलेली बारामतीची जागा त्यांनी लेकीसाठी सोडली होती.
पाहा व्हिडिओ :
संबंधित बातम्या :
सेना-भाजप युतीला बारामतीसह 48 जागा मिळतील, पवारांच्या कानपिचक्या
बारामतीचा उमेदवार कोण?, मोदी, शाह की फडणवीस, राष्ट्रवादीचं आव्हान
माझ्या तब्येतीची काळजी करु नका, शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
यावेळी 43 जागा जिंकू आणि 43 वी जागा बारामतीची असेल : देवेंद्र फडणवीस
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासाठी अमित शाहांचं मिशन 45, शिवसेनेसोबतच्या युतीचा उल्लेखही नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement