एक्स्प्लोर

Ajit Pawar: इतके दिवस वाटायचं फक्त राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेबही दिसले; अजितदादांकडून शरद पवारांवर हसतहसत पलटवार

Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांनी अजित पवारांची केलेल्या नक्कलेचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला. अशातच शरद पवारांनी केलेल्या 'नक्कले'वर अजित पवार यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ काल कण्हेरी येथे शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा पार पडली. या सभेमध्ये शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रडण्याची आणि भावनिक होण्याची नक्कल केली. शरद पवारांनी अजित पवारांची केलेल्या नक्कलेचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला. अशातच शरद पवारांनी केलेल्या 'नक्कले'वर अजित पवार यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' प्रतिक्रिया दिली. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, तो त्यांचा अधिकार आहे,पवार साहेबांना ज्या उंचीवर देश, महाराष्ट्र बघतो. एक राष्ट्रीय नेता, एक प्रगल्भ नेता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे असणाऱ्या, ज्याने रात्रीचा दिवस करू साहेबांना सतत सर्वत्र नेलं, सर्व मतदारसंघ सांभाळला. त्याठिकाणी एक सभा साहेब घ्यायचे आणि त्यावर निवडणूक व्हायची. साहेबांनी अशी नक्कल करणं अनेकांना आवडलं नाही,असं अजित पवार म्हणालेत.

पुढे अजित पवार म्हणाले, युगेंद्र पवारांनी नकल केली असती, आणखी कोणी केली असती, तर ते ठिक होतं. मी रूमाल काढला, त्यांनीही रूमाल काढला. त्या दिवशी माझ्या आई, वडिलांचं नाव घेतल्यानंतर मी भावनिक झालो. पण, मी थोडा थांबलो, पाणी पिलो आणि विषय बदलला, माणूस आहे, भावना असतात, भावनिक होतो, कायमच कठोर असतो, असं नाही. कधीकधी असं होतं, पंरतू ते नैसर्गिक पध्दतीने झालं. इतके दिवस वाटतं होतं, फक्त राज ठाकरे नक्कल करतात, पण आता दुसरं आणखी एक जण समोर आलं, मला वाईट वाटलं, दु:ख झालं की, साहेबांना दैवत मानलं. त्यांनी माझी नक्कल करावी, आम्ही लहानाचे मोठे त्यांच्यासमोर झालो. कधी कमी पडलो नाही, असंही अजित पवार पुढे म्हणाले आहेत. 

शरद पवारांनी केली अजित पवारांची नक्कल

शरद पवारांनी अजित पवारांच्या अजित पवारांच्या सभेवरून रुमाल काढून डोळे पुसून अजित पवारांची नक्कल केली. कन्हेरी येथे झालेल्या सभेत काल अजित पवार भाषण करताना भावनिक झाले होते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे नाव न घेता, शरद पवारांनी रुमाल काढून डोळे पुसल्याची नक्कल केली. या नकलेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली.

शरद पवारांच्या नकलेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहे. प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे प्रगल्भ नेत्याने माझ्यासारख्या मुलाप्रमाणे असलेल्या माझी नक्कल करणे, साहेबांनी नक्कल करणे अनेकांना आवडलं नाही. युगेंद्र पवारांनी किंवा इतरांनी केलं असतं तर ठीक होतं, असं अजित पवारांनी सांगितले. इतके दिवस वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले, असं अजित पवार म्हणाले. मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget