एक्स्प्लोर

राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाची मागणी; कोणाला मिळणार संधी, समोर आली 7 नावं

राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आधीपासूनच मवाळ भूमिका घेणार्‍या अजित दादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. असे असताना निकाल जाहीर होऊन आज चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांना पडला आहे.   त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आज या शर्यतीतून माघार घेतल्याची माहिती पुढे आली आहे. जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि अमित शाह (Amit Shah) घेतील तो आम्हाला मान्य आहे, असं शिंदेंनी म्हटलंय. त्यानंतर आता भाजपाचा मुख्यमंत्री असणार असे संकेत दिसू लागले आहेत. तर दुसरीकडे अजित दादांच्या राष्ट्रवादीतून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. 

राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आधीपासूनच मवाळ भूमिका घेणार्‍या अजित दादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळण्याची ही शक्यता आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असून अशी माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. त्यामुळे या पदावर आता कुणाची वर्णी लागते ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

धनंजय मुंडे
अदिती तटकरे
अनिल पाटील
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम
अजित पवार
छगन भुजबळ

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांची पसंती
गिरीश महाजन - सरकारचे संकटमोचक म्हणून चेहरा, सोबतच उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश लोकसभा आणि विधानसभेत मिळवून दिलंय 
रविंद्र चव्हाण - पडद्यामागून काम करणारे व्यक्तीमत्व, भाजपला कोकणातील जागा मिळवून देण्यात चव्हाण यांचा मोठा वाटा 
मंगलप्रभात लोढा - मुंबई शहरातून भाजपचा मोठा चेहरा आणि पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं गुजराती, जैन समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाची व्यक्ती 
चंद्रशेखर बावनकुळे - विधानसभेत मोठं यश मिळवून दिल्याने पुन्हा एकदा वर्णीची शक्यता 
आशिष शेलार - मुंबई अध्यक्षाच्या दृष्टीनं निवडणुकीत चांगली कामगिरी, सोबतच, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है संदर्भातलं धोरण राबवलं, आणि नोमानीचा व्हीडिओ समोर आणला, अशात पुन्हा मंत्रीपदाची शक्यता
नितेश राणे - हिंदूत्व पोस्टर बाॅय म्हणून राणेंची ओळख, भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा, कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है चा नारा पुढे नेण्यात मोठं काम 
शिवेंद्रसिंहराजे भोसले - पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा, मोठ्या लीडनं शिवेंद्रराजेंचा विजय, भोसले घराण्याचा चेहरा 
राहुल कुल - दौंडमधून तिसऱ्या विजयी, राष्ट्रवादी कांग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार 
माधुरी मिसाळ - 2009 पासून पर्वती मतदारसंघातून आमदार, पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मंत्रीपदाची शक्यता 
संजय कुटे - पश्चिम विदर्भातील भाजपचा चेहरा, फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख, सोबतच पडद्यामागून पक्ष करणारे आणि संघाच्या फळीतील चेहरा 
राधाकृष्ण विखे पाटील - नगर जिल्ह्यातील चेहरा आणि भाजपातील ज्येष्ठ चेहरा 
गणेश नाईक - नवी मुंबईतील भाजपचा मोठा चेहरा, यंदा विजय झाल्याने संधी मिळण्याची शक्यता 
पंकजा मुंडे - ओबीसी आणि मराठवाड्यातील चेहरा 
गोपीचंद पडळकर - जतमधून आमदार, राम शिंदे हरल्याने रोहित पवारांविरोधात ताकद उभी करत शह देण्याचे प्रयत्न होऊ शकतात, धनगर चेहरा 

कोणाला डच्चू मिळण्याची शक्यता-

विजयकुमार गावित 
सुधीर मुनगंटीवार 

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-

उदय सामंत 
शंभूराज देसाई 
गुलाबराव पाटील 
संजय शिरसाट 
भरत गोगावले 
प्रकाश सुर्वे 
प्रताप सरनाईक 
तानाजी सावंत 
राजेश क्षीरसागर 
आशिष जैस्वाल 
निलेश राणे 

कोणाला डच्चू मिळणार?

दीपक केसरकर 
अब्दुल सत्तार 
संजय राठोड

संबंधित बातमी:

Eknath Shinde: मोठी बातमी: मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार, एकनाथ शिंदेंनी भाजपला निरोप धाडल्याची चर्चा, किती तथ्य?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News: शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकुर
शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकुर
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP Majha : Maharashtra NewsMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 11 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaSpecial Report | Ajit pawar Budget | अर्थसंकल्पात कवितांची मैफल,दादांच्या कवितांनी उपस्थितांचं मनोरंजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News: शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकुर
शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकुर
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
Embed widget