एक्स्प्लोर

Devendra Bhuyar: मोठी बातमी : भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत?

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मोठ्याप्रमाणावर उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. देवेंद्र भुयारांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळाला.

अमरावती: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमरावतीमधील वरुड-मोर्शी विधानसभा मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, यावरुन खल सुरु असताना अजित पवार यांनी एक वेगळीच चाल खेळली आहे. अजित पवार यांनी वरुड-मोर्शी मतदारसंघातून (Varud Morshi Vidhansabha) निवडणूक लढण्यासाठी त्यांचे कट्टर समर्थक देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार होते. मात्र, त्यांनी अलीकडेच अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता अजित पवार यांनी वरुड-मोर्शी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देऊन वेगळीच चाल खेळली आहे.

देवेंद्र भुयार हे वरुड-मोर्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, यंदा त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जागा भाजपच्या उमेश यावलकर यांच्यासाठी सोडावी, असा आग्रह धरला होता.  काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी उमेश यावलकर यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले होते.  त्यामुळे महायुतीत ही जागा नक्की कोणाच्या वाट्याला जाणार, याचा फैसला अद्याप होऊ शकला नव्हता. तरीही अजित पवार यांनी आपल्याला एबी फॉर्म दिल्याची माहिती देवेंद्र भुयार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आता आपण काहीवेळातच उमेदवारी अर्ज भरु, असे देवेंद्र भुयार यांनी सांगितले. त्यामुळे आता वरुड-मोर्शी मतदारसंघावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडणार की या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी पण भुयारांना अखेर एबी फॉर्म मिळालाच

देवेंद्र भुयार यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवण्याच्यादृष्टीने अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, पहिल्या दोन उमेदवारी याद्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे देवेंद्र भुयार मुंबईत ठाण मांडून बसले होते. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने देवेंद्र भुयार नाराज होऊन माघारी परतले होते. यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला 'उमेदवारी अर्ज भरायला चला', असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे देवेंद्र भुयार अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असे दिसत होते. मात्र, अजितदादा गटाकडून त्यांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला.

आणखी वाचा

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुखांनी लेकालं उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
अनिल देशमुखांनी लेकालं उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
Kolhapur Uttar Vidhan Sabha :माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
Vasant Deshmukh : मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
Vishal Patil : 'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane : महायुतीचा 160 जागांवर विजय होईल, नारायण राणेंना विश्वासHasan Mushrif Kolhapur : कागलमध्ये हसन मुश्रीफांचं उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्तिप्रदर्शनAmit Thackeray File Nomination : पहिल्यांदा विधानसभा लढवणार. अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरे काय बोलले?ABP Majha Marathi News Headlines maharshtra poltics Vidhansabha 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुखांनी लेकालं उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
अनिल देशमुखांनी लेकालं उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
Kolhapur Uttar Vidhan Sabha :माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
Vasant Deshmukh : मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
Vishal Patil : 'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी
भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी
Baramati Vidhan Sabha: बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय, आता अजितदादाच जिंकणार: सुनेत्रा पवार
बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय, आता अजितदादाच जिंकणार: सुनेत्रा पवार
Chhagan Bhujbal : कांदेंविरोधात अपक्ष शड्डू ठोकलेल्या समीर भुजबळांना महायुतीचा पाठींबा? छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
कांदेंविरोधात अपक्ष शड्डू ठोकलेल्या समीर भुजबळांना महायुतीचा पाठींबा? छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
Hasan Mushrif : मी मुख्यमंत्री नाही, पण उपमुख्यमंत्री होणार! आमच्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत?
मी मुख्यमंत्री नाही, पण उपमुख्यमंत्री होणार! आमच्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत? : हसन मुश्रीफ
Embed widget