एक्स्प्लोर
ख्रिस्ती धर्मगुरुकडे जाणं चूकच, मात्र नवख्या पार्थला फासावर लटकवता का? : अजित पवार
'पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिस्ती धर्मगुरुकडे जाण्याचं कृत्य चुकीचंच होतं. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. मात्र, मी त्याला समजावून सांगितलं.' असं अजित पवार म्हणाले.
पंढरपूर : पार्थ पवारांना वारंवार ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्यामुळे वडील अजित पवार यांनी माध्यमांवर आगपाखड केली. पार्थ तरुण आहे, तो चुकला तर लगेच फाशी द्याल का? असे खडे बोल अजित पवारांनी सुनावले.
मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवत असलेल्या पार्थ पवार यांना नेटिझन्सकडून वारंवार ट्रोल व्हावं लागत आहे. 'पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिस्ती धर्मगुरुकडे जाण्याचं कृत्य चुकीचंच होतं. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. मात्र, मी त्याला समजावून सांगितलं.' असं अजित पवार म्हणाले.
'सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जावं लागतं. ही गोष्ट अजित पवारांनी केली असती, तर ती चूक ठरली असती. पण पार्थकडून ते नकळत झालं.' असं सांगत एक पिता पुत्राच्या मागे उभा असल्याचं अजित पवारांनी दाखवून दिलं.
पार्थ पवारांनी गेल्या आठवड्यात विनियार्ड वर्कर्स चर्चला सदिच्छा भेट दिली. यावेळी फादर डॉ. पीटर सिल्व्हा यांनी विजयासाठी आशीर्वाद दिले होते. हे फादर पीटर सिल्वा म्हणजे केवळ देवाला प्रार्थना करुन हृदयरोगासारखा आजार बरा करण्याचा दावा करणारे धर्मगुरु. त्यांचे काही अनुयायी तर खुद्द येशूंना मंचावर पाहिल्याचा दावा करतात.
VIDEO | वादग्रस्त दावे करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंची भेट, पार्थ पवार टीकेचे धनी
दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुरु असलेल्या धमक्यांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येईल का, याची माहिती घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीची भाजप-शिवसेनेला मदत होईल, असं वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ज्या मंडळींच्या सहकारी बॅंका, खाजगी सहकारी कारखाने अडचणीत आले आहेत, ज्यांच्यामागे चौकशांचा ससेमिरा सुरु आहे, असे दगडाखाली हात अडकलेले सध्या भाजपमध्ये जात असल्याचा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement