एक्स्प्लोर
नेत्यांची भाषणबाजी लांबल्याने अजित पवार संतापतात तेव्हा...
तुम्हाला बोलायचे असेल तर बोलत बसा, मी चाललो असे म्हणत त्यांनी सूत्रसंचालकास फटकारले. स्वतः अजित पवार चिडलेले दिसल्यामुळे सूत्रसंचालकाने आवरतं घेतलं आणि सरळ उमेदवार दत्तात्रय भरणे यांना बोलण्यास सांगितले.
इंदापूर : सध्या निवडणुकीचे धामधूम असल्यामुळे स्टार प्रचारकांची सभेसाठी धावाधाव होत आहे. त्यातच कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांसमोर भाषणाला संधी मिळाली तर तो माईक सोडायला तयार नसतो. मात्र लांबत चाललेल्या भाषणबाजीला कंटाळलेल्या अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. हा प्रकार घडला इंदापूर तालुक्यातील बावडा येथील सभेत. इंदापूर तालुक्यातील बावडा या गावची सभा उरकून अजित पवारांना पुढच्या सभेला निघायचे होते.
मात्र सूत्रसंचालक भाषणासाठी वेगवेगळ्या नेत्यांची नावे घेऊन भाषण करण्यास सांगत होता. आपल्याला उशीर होत आहे, असे सांगून देखील तोच प्रकार सातत्याने होत राहिल्याने अजित पवार संतापले. अजित पवारांनी भरसभेत उठून माइककडे जाऊन त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तुम्हाला बोलायचे असेल तर बोलत बसा, मी चाललो असे म्हणत त्यांनी सूत्रसंचालकास फटकारले. स्वतः अजित पवार चिडलेले दिसल्यामुळे सूत्रसंचालकाने आवरतं घेतलं आणि सरळ उमेदवार दत्तात्रय भरणे यांना बोलण्यास सांगितले.
हर्षवर्धन पाटील स्टाईलबाज नेता : अजित पवार
हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले की, 'ते काय स्टाईलबाज राहतात. केसावरून कंगवा फिरवतात. मला तर कंगवा फिरवायला काहीच राहिले नाही', असे सांगत त्यांनी स्वतःचे डोके उपस्थितांना दाखविले. पण हर्षवर्धन पाटील म्हणतील त्यांना काय राहीलं नसेल म्हणून कंगवा काढत नाहीत, पण माझ्याकडे पण कंगवा आहे असे म्हणत त्यांनी स्वतःच्या खिशातून कंगवा काढत दाखविला. यावेळी सभेत एकच हशा पिकला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
Advertisement