एक्स्प्लोर

राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच बाप लेकीची राजकीय संघर्ष; आत्राम राजघराण्यासह दोन्ही राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

Aheri Election 2024 : गडचिरोली जिल्ह्यातला अहेरी हा मतदारसंघ आत्राम राजघराण्याचा पारंपारिक मतदार संघ आहे. मात्र याच मतदारसंघात राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच बाप लेकीची राजकीय संघर्ष बघायला मिळतोय.

Aheri Vidhan Sabha Election 2024 : गडचिरोली जिल्ह्यातला अहेरी हा मतदारसंघ (Aheri Vidhan Sabha Election 2024) आत्राम राजघराण्याचा पारंपारिक मतदार संघ आहे. दक्षिण गडचिरोलीतल्या आदिवासी मतदारांवर प्रभाव असलेल्या या आत्राम राजघराण्यातील एक नवी लढत मतदारांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बाप लेकीची राज्यातली ही पहिली लढत असल्याचे पहायला मिळत आहे. घरातील फुटीमुळे राजकीय वातावरण तापले असताना पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील असा राजकीय संघर्ष पेटला आहे.  

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जनसन्मान यात्रेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलगी आणि जावयाविषयी केलेल्या विधानावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्या नंतर 12 सप्टेंबरला मंत्री आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम (हलगेकर ) (Bhagyashree Atram) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच वडील विरुद्ध मुलगी असा राजकीय संघर्ष उभा झाला आहे.  राज्यात विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharamrao Baba Atram) यांना त्यांच्याच मोठ्या मुलीने आव्हान दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

आत्राम राजघराण्यात राजकीय वादाची ठिणगी?

लोकसभा निवडणुकीनंतर आत्राम राजघराण्यात राजकीय वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम लोकसभेकरिता इच्छुक होते. परंतु ऐनवेळेवर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे त्यांनी विधानसभेकडे लक्ष केंद्रीत केले. मात्र, त्यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम, जावई ऋतुराज हलगेकर हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने घरातच सत्ता संघर्षाला सुरुवात झाली. त्यामुळे आजपर्यंत धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली मोठे झालेले मुलगी आणि जावई आता त्यांनाच आव्हान देत आहेत. 

आत्राम राजघराण्यासह दोन्ही राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

दरम्यान,  6 सप्टेंबरच्या जनसन्मान यात्रेत भाषणादरम्यान मंत्री आत्राम यांनी मनातील खदखद जनतसमोर बोलून दाखविल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात याविषयी चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, बांधकाम सभापतीसह विविध राजकीय पद भूषवलेल्या भाग्यश्री आत्राम या मागील काही दिवसापासून शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या. अनिल देशमुख यांनीदेखील याविषयी वेळोवेळी भाष्य केले होते. 12 सप्टेंबरला अहेरी येथे भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर आपल्या समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश करणार, अशी  चर्चा रंगली होती आणि अखेर जे नव्हतं व्हायचं ते झाल आणि अखेर भागेश्री आत्राम हलगेकर यांनी आपल्या वडिलांची साथ सोडली.  जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्या उपस्थित शरद पवार गटात  भाग्यश्री आत्राम यांनी प्रवेश केला. त्यामुळे गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलीचा राजकीय संघर्ष पेटला असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

भाग्यश्री आत्राम यांनीं वडिलांच्या विरोधात बंड पुकारले असले तरी वडिलांनी मात्र ते आव्हान स्वीकारून गेलीं पन्नास वर्ष राजकीय जीवनात मतदार संघाच्या विकाससाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मतदारासमोर मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मतदारराजा नेमकं कोणाच्या पारड्यात मत टाकून विजयी मोहर लावतात हे येत्या काळात कळणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
Nawab Malik ED Bail: निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर शरद पवार यांची प्रतिक्रियाSolapur PM Modi Sabha : सोलापूरमध्ये आज पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची प्रचार सभा #abpमाझाEknath Shinde On Uddhav Thackeray : मला जेलची धमकी देऊ नका, मी चळवळीतून आलोय- शिंदेRajendra Mulak:राजेंद्र मुळकांवर कारवाई केवळ दिखावा?मुळकांवर कारवाई होऊनही काँग्रेस नेते व्यासपीठावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
Nawab Malik ED Bail: निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Embed widget