एक्स्प्लोर

Assembly Election Exit Polls: भाजपच्या हातून दोन राज्यं निसटण्याचा अंदाज

Assembly Election Exit Polls 2018: भाजपच्या हातातली दोन मोठी राज्यं निसटण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याची चिन्हं आहेत.

मुंबई : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 11 डिसेंबरला सर्वच विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये मतदार राजाचा कौल पाहायला मिळत आहे. भाजपच्या हातातली दोन मोठी राज्यं निसटण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याची चिन्हं आहेत. एबीपी न्यूज, लोकनीती आणि सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार 15 वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात यंदा सत्ताधाऱ्यांना जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस भाजपच्या हातून सत्ता खेचण्यात यशस्वी ठरणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. राजस्थान आपली परंपरा कायम राखणार असल्याचंही एबीपी न्यूज, लोकनीती आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं राज्य खालसा होणार असून, काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. सलग तीन टर्म सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये मात्र यंदाही भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरण्याची चिन्हं आहेत. अजित जोगी आणि मायावती यांच्या आघाडीचा फटका काँग्रेसला बसल्याचं पोलमध्ये दिसत आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचं सर्वेक्षणात दिसत आहे. दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य असलेल्या तेलंगणात चंद्रशेखर राव सत्ता कायम राखणार असल्याचं दिसत आहे. तेलंगणात काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाला अपशय आल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. राजस्थानात वसुंधरा राजेंना धक्का राजस्थान विधानसभेत 200 जागा असून बहुमताचा आकडा 101 आहे. मात्र 199 जागांवर निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस 101 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. भाजपच्या पारड्यात 83 जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 15 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात भाजपची हार, काँग्रेस सत्ता मिळवण्याचा अंदाज मध्य प्रदेश विधानसभेत 230 जागा असून बहुमताचा आकडा 116 आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात काँग्रेस 122 ते 130 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. भाजपच्या पारड्यात केवळ 91 ते 97 मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच काँग्रेसला सरासरी 126, तर भाजपला 94 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. 10 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. रमण सिंह चौथ्यांदा छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याची चिन्हं छत्तीसगड विधानसभेत 90 जागा असून बहुमताचा आकडा 46 आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजप 48 ते 56 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. काँग्रेसच्या पारड्यात 32 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच भाजपला सरासरी 52, तर काँग्रेसला सरासरी 35 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर 3 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget