एक्स्प्लोर

Nagpur Lok Sabha Exit Poll 2024 : नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी विजयाची हॅट्रिक करणार; पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलचा अंदाज

विदर्भातील सर्वात चर्चेची आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात यंदा सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Exit Poll Result 2024 नागपूर : अठराव्या लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) अखेर सांगता झाली आहे. आज देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी संपल्यावर साऱ्यांची उत्सुकता   असलेल्या एक्झिट पोलचे (Result 2024 Exit Poll) आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचं एबीपी सी वोटरच्या एक्झिट (ABP-CVoter) पोलमध्ये समोर आले आहे. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला यांच्यात अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे. 

तर दुसरीकडे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी ज्या विदर्भापासून सुरवात झाली, त्या विदर्भातील सर्वात चर्चेची आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात यंदा सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री आणि भाजपेचे दिग्गज नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा कधीकाळी गड असलेला मतदारसंघ राखण्यात यंदा देखील अपयश येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नितीन गडकरी विजयाची हॅट्रिक करणार

विदर्भातील सर्वात चर्चेची आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात यंदा सलाग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात होते. नितीन गडकरी आपल्या विकासकामांच्या जोरावर बहुमताने विजयी होतील, असा दावा भाजपने वेळो वेळी केला होता. तर दुसरीकडे त्यांच्या विरुद्ध महविकास आघाडीने देखील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना मैदानात उतरवत ही निवडणूक अधिक रंगत केली. मात्र कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपूर मतदारसंघात विकास ठाकरे विजयी पताका फडकवतील, की महायुतीचे नेते नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा विजयाची हट्रिक करतील? याबाबत साऱ्यांना उत्सुकता आहे. मात्र, टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्का?

अशातच पूर्व विदर्भात मात्र भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Election 2024) भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे पिछाडी वर असल्याचा अंदाज टिव्ही 9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार सांगण्यात आले आहे. तर महविकास आघाडीच्या  काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आघाडीवर असून 2014 आणि 2019 प्रमाणेच काँग्रेस गड अभेद्य ठेवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   

बीपी सी वोटर एक्झिट पोल

  • महायुती
    भाजप : 17
    शिंदे गट : 6
    अजित पवार गट : 1 
  • महाविकास आघाडी
    ठाकरे गट : 9
    काँग्रेस : 8
    शरद पवार गट : 6
    इतर : 1

एनडीए (NDA) : 353-383

इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182

इतर : 4 -12

इतर महत्वाच्या बातम्या 

Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget