एक्स्प्लोर
अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, विखेंबाबत लवकरच निर्णय, अशोक चव्हाणांचा सूचक इशारा
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असा सूचक इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी दिला.

जालना : औरंगाबादमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालन्यात याविषयी घोषणा केली. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असा सूचक इशाराही यावेळी चव्हाणांनी दिला. जालन्यातून काँग्रेसचे लोकसभा उमेदवार विलास औताडे यांची प्रचारसभा भोकरदनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाणांनी ही घोषणा केली. विखे हे अहमदनगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखेंचा प्रचार करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली होती. राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचंही म्हटलं जातं.



















