एक्स्प्लोर
Advertisement
ओला दुष्काळ आढावा बैठक ही भाजप-शिवसेनेची कोंडी फोंडण्याच्या दिशेने पहिलं पाऊल?
सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या पर्श्वभूमीवर आजची बैठक अतिशय महत्त्वाची ठरत आहे. कारण एकीकडे सत्ता स्थापनेच्या प्रस्तावावर शिवसेना-भाजपमधील कोंडी फुटत नसली तरी आजच्या दुष्काळ आढाव्याच्या शासकीय बैठकीला शिवसेनेच्या जवळपास सर्व प्रमुख मंत्र्यांनी हजेरी लावली आहे.
मुंबई : सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालक मंत्र्यांची बैठक सुरु आहे. आज या बैठकीत ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचा आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. सर्व पालक मंत्री त्यांच्या जिल्ह्यात आढावा घेऊन आले आहेत. त्यांचा अहवाल आज सरकार दरबारी सादर केला जाईल. या अहवालाच्या आधारे अंदाजित नुकसान आणि प्रत्यक्षात झालेलं नुकसान याबाबतची वस्तुस्थिती तपासली जाईल.
मात्र सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या पर्श्वभूमीवर आजची बैठक अतिशय महत्त्वाची ठरत आहे. कारण एकीकडे सत्ता स्थापनेच्या प्रस्तावावर शिवसेना-भाजपमधील कोंडी फुटत नसली तरी आजच्या दुष्काळ आढाव्याच्या शासकीय बैठकीला शिवसेनेच्या जवळपास सर्व प्रमुख मंत्र्यांनी हजेरी लावली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक केसरकर आणि दादा भुसे यांचा समावेश आहे.
त्यामुळे एकीकडे सत्ता स्थापनेच्या प्रस्तावावर शिवसेनेकडून एकट्या संजय राऊतांची तोफ धडाडत असली तरी सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक टाळलेली नाही. यामुळे शिवसेनेत भजपसोबत सत्ता स्थापन करण्यावरुन दोन मत प्रवाह असल्याची जोरदार चर्चा आहे.
अशा परिस्थितीत दुष्काळ उपाय योजनेसह आजच्या बैठकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे प्रतिनिधी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर मंत्र्यांसोबत समोरासमोर 'अक्रॉस द टेबल' चर्चेसाठी आले. याचाच अर्थ शिवसेनेला टॉकिंग टर्म्सवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची पहिली खेळी यशस्वी झाल्याचं बोललं जातं आहे. तसेच शिवसेनेतील सत्तेत सहभागी असलेला एक गट भाजपसोबत जाण्यास अनुकूल असल्याचे यातून संकेत मिळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आजच्या बैठकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपची कोंडी फुटण्याची सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच पुढच्या दोन दिवसात वाटाघाटी सुरळीत पार पडली तर 8 नोव्हेंबरला महायुतीच्या सरकारचा शपथविधी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement