WCR Recruitment 2021 : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज
WCR Recruitment 2021 : स्पोर्ट्स स्टूडंट्ससाठी महत्त्वाची बातमी. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंसाठी पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीची संधी. जाणून घ्या कसा कराल अर्ज...
WCR Recruitment 2021 : जर तुम्ही स्पोर्ट्स स्टुडंट असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. पश्चिम मध्य रेल्वे (Western Central Railway) ने खेळाडूंसाठीच्या पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसाठी निवेदनाची प्रक्रिया 21 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर 20 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. एकूण 21 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांनी जाहीर केलेली अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतरच या पदांसाठी अर्ज करावा. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, नियमानुसार केलेला अर्जच वैध असेल.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
तांत्रिक नसलेल्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, तांत्रिक पदांसाठी, उमेदवार आयटीआय पदवीसह 10 वी उत्तीर्ण असावा. तसेच या सर्व पदांसाठी उमेदवाराने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेला असावा.
वयोमर्यादा (Age Limit)
रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 वर्षांहून 25 वर्षांमध्ये असणं गरजेचं आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
कधीपर्यंत कराल अर्ज?
अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 डिसेंबर 2021
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख : 20 जानेवारी 2021
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Upcoming Government Jobs 2022 : नव्या वर्षात सरकारी नोकऱ्यांचा पाऊस; पाहा संपूर्ण यादी
- UPSC CDS Recruitment : यूपीएससी सीडीएस परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
- Bank Recruitment : कनिष्ठ अधिकारी पदाच्या 300 रिक्त जागांसाठी भरती, येथे करा अर्ज
- Job Majha : भारतीय कृषी संशोधन संस्था, महाराष्ट्र वन विभाग आणि सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये नोकरीची संधी
- SSC कडून 2022 मधील भरती परीक्षांचे वेळापत्रक; इथं करा चेक
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI