एक्स्प्लोर

Virar : शिक्षिकेच्या घरात 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, विरारमध्ये प्राचार्यांवर गुन्हा दाखल

Virar HSC Exam Case : परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षित पद्धतीने शाळेतच तपासण्याचे निर्देश असतात. त्यामुळे या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या असा प्रश्न विचारण्यात येतोय.

पालघर : बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणी विरारमधील प्राचार्य आणि शिक्षकांवर बोळींज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी नसतानाही बेकायदेशीररित्या या उत्तरपत्रिका घरी नेण्यात आल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या होत्या.

विरार मध्ये 12 वी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. विरारच्या नानाभात या परिसरात राहणाऱ्या प्रिया रोड्रिंक्स या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली. उत्तर पत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत बोळींज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जळालेल्या उत्तरपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. 

175 उत्तरपत्रिका जळाल्या

बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या एकूण 300 उत्तरपत्रिका शिक्षिकेने तपासणीसाठी घरी नेल्या होत्या. घरात अचानक आग लागली आणि या आगीत संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला. त्यामध्ये 175 उत्तरपत्रिका जळाल्या. ही घटना 10 मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोळींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली होती.

या प्रकरणी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाच्या विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी विरारच्या बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शासनाचा प्रतिनिधी म्हणून जोत्स्ना शिंदे यांनी तक्रार केली. त्यांच्यासोबत ज्योत्स्ना शिंदे यांच्या सोबत पालघरच्या माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षण अधिकारी संगिता भागवत याही सोबत होत्या. ज्या शिक्षकाच्या घरी बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, त्या शिक्षिकेलाही पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्षिकेवर योग्य ती कारवाई व्हावी

बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेतच तपासणे बंधनकारक असताना त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी कशा नेल्या? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार, परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षित पद्धतीने शाळेतच तपासण्याचे निर्देश असतात. त्यामुळे या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या असा प्रश्न विचारण्यात येतोय. उत्तरपत्रिका जळल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही

जळालेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी करून त्याचे गुणदान झाले असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. कारण गुणदान केलेला कागद सुरक्षित आहे अशी माहिती आहे. आत्पकालीन परिस्थिती आल्यास उत्तरपत्रिका नष्ट झाली असल्यास इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून संबंधित विषयाचे गुण देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही.

ही बातमी वाचा: 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025 7 PmSatish Bhosale Khokya News | सहा दिवस खोक्या होता कुठे? खोक्याला बेड्या कश्या ठोकल्या? ते खोक्याच्या घरावरील कारवाई; संपूर्ण व्हिडीओTop 100 News : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 7 PmLadki Bahin Yojana  News | लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांना फटका, अर्थमंत्री अजित पवारांवर इतर विभागांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Embed widget