College Admission: विद्यार्थ्यांनो, प्रवेशासाठी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार
राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार विविध अभ्यासक्रमात अॅडमिशनसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी तयारी सुरु केली आहे. विद्यार्थ्यांनी 'या' कागदपत्रांची जळवा-जुळव करुन ठेवावी.
नागपूरः नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आता विविध अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तत्पूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव महत्त्वाची असून त्यासाठी धावपळ वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी जाताना आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण आहेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेचे आहे. शिवाय अर्ज भरताना तो अचूक भरला जाईल, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
* नीट ऑनलाइन फॉर्म प्रिंट
* नीट प्रवेश पत्र व नीट मार्कशिट
* मार्क मेमो 10 वी, सनद 10 वी, मार्क मेमो 12वी
* नॅशनॅलिटी सर्टिफिकेट
* रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उतपन्न प्रमाणपत्र किंवा वडिलांचा फॉर्म क्र. 16
* 12वी ची टीसी
* मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट
* मुलाचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते
* मुलाचे तसेच आई-वडिलांचे दोघांचे पॅनकार्ड
इतर कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेशासाठी शैक्षणिक प्रमाणपत्रांसह हे दस्तावेज आवश्यक
* जाती प्रमाणपत्र
* जातीवैधता प्रमाणपत्र
* नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
* डोमिसाइल प्रमाणपत्र
* ईडब्ल्यूएस वर्ग प्रमाणपत्र
* दिव्यांगता प्रमाणपत्र
* आधार क्रमांक
* राष्ट्रीयकृत बँक खाते
* सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
* अल्पसंख्याक वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1. जातीचे प्रमापत्र
2. जातवैधता प्रमाणपत्र
3. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
फॉर्म भरताना घ्या काळजी
* अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी सोबत ठेवावी. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलरही जवळ बाळगावा.
* विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ, इत्यादींची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.
नोटः अर्ज भरताना नाव, पालकांचे नाव, अडनाव योग्य रकान्यातच लिहावे, इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास स्पष्ट अक्षरातच अर्ज भरावा आणि सूचना असल्यास कॅपिटल अक्षरातच अर्ज भरावा
आवर्जून लक्षात ठेवा
* अर्जात त्रुटी राहू नये म्हणून सुरुवातीला अर्जाची झेरॉक्स काढून त्यावर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. अर्जातील एखादी गोष्ट समजली नाही तर मार्गदर्शन घ्या आणि नंतर भरा.
* अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा, एन वेळेवर अर्ज भरण्याचे टाळा
* इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.
* बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅनकरा. ते पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करुन ठेवा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI