एक्स्प्लोर

Sujay Vikhe: 'महायुतीचा 'त्या' वक्तव्याशी संबंध नाही, योग्य कारवाई...'; वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया

Sujay Vikhe Patil On Vasantrao Deshmukh Statement: पोलीस प्रशासनाने वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करावी. पण त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर, आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या त्यांच्यावर देखील कारवाई करावी.

Sujay Vikhe Patil On Vasantrao Deshmukh Statement: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe-Patil) यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. सुजय विखे पाटलांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे. जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात काल (दि.25) सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. टीका करणारे वसंतराव देशमुख धांदरफळ गावातील रहिवासी आहेत. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आला, देशमुख यांच्या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे, यावर सुजय विखे पाटलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले सुजय विखे पाटील?

महायुतीच्या मेळाव्यामध्ये वसंतराव देशमुख या गृहस्थांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय आक्षेपार्ह भाषेत टीका केली, त्यांचे भाषण सुरू असताना मी त्यांना दोनदा थांबवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते थांबले नाहीत. मी तिथे असताना मला ते समजलं नाही, नंतर एकाने मला सांगितलं ते काय बोलले, मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्याआधी हा सर्व गोंधळ उडाला. महायुतीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचं त्या वक्तव्याशी संबध नाही, त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, जर अशा खालच्या पातळीवर किंवा पातळी सोडून वक्तव्ये करत असेल तर त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पक्षात ठेवलं जाणार नाही. त्याला महायुतीमध्ये ठेवलं जाणार नाही, असंही यावेळी सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे. 

वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. योग्य ती कारवाई त्यांच्यावर करावी, या वक्तव्यावर कलम लावून पोलिस प्रशासनाने यावर कारवाई करावी,त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या आणि जाळल्या त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असंही विखे पाटलांंनी म्हटलं आहे. वक्तव्य झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या, फोडण्यात आल्या. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. 

मला फोन आला तेव्हा मी दोन मिनीटे बाजुला गेलो, त्यावेळी ते स्टेजवर बोलत होते, त्याचवेळी कार्यकर्ते म्हणाले त्यांना खाली बसवा ते काहीतरी आक्षेपार्ह बोलतील, पण ते ऐकत नव्हते, ते बोलत असताना त्यांनी आक्षेपार्ह टीका केली, त्यांच्या या वक्तव्याशी आमचा, महायुतीतील कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा संबध नाही, आम्ही या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. अशा प्रकारची टीका, किंवा आक्षेपार्ह भाषेतील वक्तव्य टाळली पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

वसंतराव देशमुख यांचं वक्तव्य काय?

‘भाऊसाहेब थोरात यांची नात, ती तर बोलती म्हणत्यात, माझा बाप सगळ्याचा बाप. काही कळत नाही तुला सुद्धा पोरं कशी झाली? आपल्या कन्येला समजवा, नाही तर आम्ही निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही.’‘सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण या ताईचे पराक्रम जर पाहिले ना, सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वक्तव्य वसंतराव देशमुख यांनी केलं आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी :  मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...
मोठी बातमी : मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...
'वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध, पण सुजय विरोधात पूर्व नियोजित कट'; शालिनी विखे पाटलांचा गंभीर आरोप
'वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध, पण सुजय विरोधात पूर्व नियोजित कट'; शालिनी विखे पाटलांचा गंभीर आरोप
Shirol Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने आणखी एक मतदारसंघ खेचला! शिरोळमधून गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने आणखी एक मतदारसंघ खेचला! शिरोळमधून गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर
...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप
...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sujay Vikhe Patil : मला घटना घडण्याच्या आधी फोन आला अन् .... ;सुजय विखेंचा खळबळजनक आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 26 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJayashree Thorat : असं मी काय केलं की एवढं वाईट माझ्याविषयी बोलावं - थोरात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी :  मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...
मोठी बातमी : मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...
'वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध, पण सुजय विरोधात पूर्व नियोजित कट'; शालिनी विखे पाटलांचा गंभीर आरोप
'वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध, पण सुजय विरोधात पूर्व नियोजित कट'; शालिनी विखे पाटलांचा गंभीर आरोप
Shirol Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने आणखी एक मतदारसंघ खेचला! शिरोळमधून गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने आणखी एक मतदारसंघ खेचला! शिरोळमधून गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर
...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप
...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप
Congress 2nd Candidate List : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; आतापर्यंत महाविकास आघाडीकडून 196 जागांवर उमेदवार जाहीर
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; आतापर्यंत महाविकास आघाडीकडून 196 जागांवर उमेदवार जाहीर
Meghna Bordikar Property : पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ, डोक्यावर 7 कोटींचे कर्ज, मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ, डोक्यावर 7 कोटींचे कर्ज, मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
Sujay Vikhe: 'महायुतीचा 'त्या' वक्तव्याशी संबंध नाही, योग्य कारवाई...'; वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
'महायुतीचा 'त्या' वक्तव्याशी संबंध नाही, योग्य कारवाई...'; वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
आधार कार्डाला 'जन्म तारखेचा' पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मग कोणतं कागदपत्र ठरणार योग्य?
आधार कार्डाला 'जन्म तारखेचा' पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मग कोणतं कागदपत्र ठरणार योग्य?
Embed widget