Maharashtra SSC Board Result 2025 Live: ऑल द बेस्ट! दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर, रिझल्ट पाहा एका क्लिकवर
Maharashtra SSC Board Result 2025 Live: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज (13 मे) जाहीर करण्यात आला.

Background
Maharashtra SSC Board Result 2025 Live: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 94.10 % , कोकण विभागाची बाजी 98.82 टक्के, नागपूर सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास 16.11 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता.
SSC Result 2025: झटपट रिझल्ट चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
Maharashtra SSC Board Result 2025: दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; झटपट रिझल्ट चेक करण्यासाठी इथे क्लिक करा, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
























