Maharashtra SSC Board Result 2025: दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; झटपट रिझल्ट चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
Maharashtra sscresult.mahahsscboard.in: यंदा दहावीचा निकाल 94.10 % , कोकण विभागाची बाजी 98.82 टक्के, नागपूर सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे.

Maharashtra SSC Board Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra SSC Board Result 2025) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 94.10 % , कोकण विभागाची बाजी 98.82 टक्के, नागपूर सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे.
दहावीचा निकाल कुठे पाहाल?
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- http://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
आज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास 16.11 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता.
पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षांनी शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 62 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात आले. कॉपी असणाऱ्या केंद्रावर केंद्रसंचालक, शिक्षक बदलून दिले. 37 केंद्रांवर गैरप्रकार घडले आहेत. त्या केंद्राची मान्यता कायमची बंद करण्यात येणार असा निर्णय झाला आहे. पुणे, नागपूर,छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून 15,58020 नोंदी केली, 15,46579 परीक्षा दिली, पैकी 14,55433 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारीची आकडेवारी 94.10 टक्के इतकी आहे.
निकालाची विभागनिहाय टक्केवारी
पुणे : 94.81 टक्के
नागपूर : 90.78 टक्के
संभाजीनगर : 92.82 टक्के
मुंबई : 95.84 टक्के
कोल्हापूर : 96.78 टक्के
अमरावती : 92.95 टक्के
नाशिक : 93.04 टक्के
लातूर : 92.77 टक्के
कोकण : 99.82 टक्के
राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के, VIDEO:
संबंधित बातमी:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

























