Solapur News : 50 गुणांच्या परीक्षेत मिळाले 99 गुण, निकाल पाहून विद्यार्थीही चकीत; सोलापूर विद्यापीठातील अजब प्रकार
Solapur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 50 पैकी 99 गुण दिल्याने विद्यार्थी चक्रावले आहेत.
Solapur University Exam Issue : सोलापूर विद्यापीठातील (Solapur University) अजब-गजब प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) परीक्षा निकालांचा (Exam Result) भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना 50 पैकी 99 गुण दिल्याने विद्यार्थीही चक्रावले. बीएससी सेमिस्टर तीनच्या निकालातील प्रकार हा प्रकार समोर आला आहे.
50 गुणांच्या परीक्षेत 99 गुण
काही विद्यार्थ्यांना 50 गुणांच्या परीक्षेत एका विषयाला 50 हून अधिक गुण दिले गेले. सोलापूर विद्यापीठाकडून 13 डिसेंबर 2023 पासून 22 डिसेंबरपर्यंत बीएससी सेमिस्टर 3 च्या परीक्षा पार पडल्या. याचा निकाल समोर येताच सर्वजण चकीत झाले. या निकालामध्ये विद्यापीठाने 40 गुणांचा लेखी पेपर तर 10 गुणांची असाइनमेंट अशी एकूण 50 गुणांची परीक्षा घेतली होती.
सोलापूर विद्यापीठाचा अजब कारभार
दरम्यान, या परीक्षेचा 5 फेब्रुवारीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात झालेल्या चुकामुळे विद्यार्थी चांगलेच चक्रवले आहेत. क्लेरीकल चुकीमुळे हे घडल्याचं समोर आलं आहे. चूक लक्षात येताच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका बदलून दिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान, क्लेरीकल चुकीमुळे केवळ चार विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याची विद्यापीठ प्रशासनाने दिली कबुली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI