SSC Board Exams: दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान
कोरोनामुळे ओढावलेल्या परिस्थितीत दहावीची परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ नये यामुळे राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, मात्र ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन नये अशी एक जनहित याचिका मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे.

मुंबई : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी करत हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. अशात परीक्षा घेणं विद्यार्थ्यांसाठी व इतर कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असू शकतं. मात्र राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देत निवृत्त प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठाचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे.
राज्यात SSC बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Majha Vishesh : SSC च्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार? अकरावीच्या प्रवेशाचं काय? माझा विशेष
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























