NEET Exam 2021 : लातूरमध्ये NEET 2021 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन सराव परीक्षेला परवानगी
लातूरमध्ये NEET 2021 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन सराव परीक्षेला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी काही अटी-शर्थी प्रशासनानं लागू केल्या आहेत. त्यांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे.
लातूर : मार्च 2020 पासून करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशातील अनेक क्षेत्र आणि व्यवहार ठप्प झाले. शाळा कॉलेजवरही याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर ऑनलाईन शिक्षणास प्राधान्य देण्यात आले होते. दुसऱ्या लाटेनंतर कमी झालेली रुग्णसंख्या, लसीकरण मोहीम यामुळे काही नियम आणि अटींची पूर्तता केल्यास ऑफ लाइन शिक्षणास सुरुवात करता येईल का? याची चाचपणी सुरु आहे. लातूर हे राज्यात शैक्षणिक हब म्हणून नावारूपाला आले आहे. येथे बारावीचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी 20 ते 25 हजार विद्यार्थी येत असतात. लातूर शहराचे अर्थकारण यावरच अवलंबून आहे. येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थांच्या पालकांनी ऑफ लाईन नीट (NEET) सराव परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी लातुरचे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर आज सकारात्मक निर्णय झाला आहे. NEET 2021 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन सराव परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र यासाठी 12 अटींची पूर्तता करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
नीट सराव परीक्षा घेण्यासाठी अटी-शर्थी :
- नीट 2021 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन सराव परीक्षा घेताना covid-19 प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
- सर्व शिक्षक संबंधित कर्मचारी यांचे 100% कोविड लसीकरण करून घेणे बंधनकारक असेल यासाठी आवश्यकतेनुसार आरोग्य विभाग, लातूर शहर महानगरपालिका यांच्यामार्फत यांचे आयोजन करावे.
- याठिकाणी बैठक व्यवस्था शारीरिक अंतरांचे नियम पालन करून आयोजित करावी.
- शिक्षक, स्टाफ, विद्यार्थी यांच्यासाठी फेस मास्कचा वापर अनिवार्य असेल विना मास्क प्रवेश देण्यात येऊ नये
- नियमित निर्जंतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता, वेंटीलेशन, स्वच्छतेसाठी प्रवेशद्वारावर हँडवॉशची व्यवस्था टेम्परेचर तपासणी इत्यादीची व्यवस्थेबाबत कटाक्षाने लक्ष द्यावे
- या आदेशाद्वारे केवळ नीट 2021 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन सराव परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात येत आहे
- या परीक्षा शारीरिक अंतर नियमांचे पालन करून बैठक व्यवस्थेच्या 50% मर्यादित किंवा जास्तीत जास्त 50 विद्यार्थी संख्येच्या मर्यादित आयोजित करावे कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के मर्यादित विद्यार्थ्यांचे वर्ग आयोजित करण्यात येऊ नयेत
- एक बैच संपल्यानंतर दुसरी बॅच तीस मिनिटानंतर आयोजित करावी मध्यान्ह कालावधीत वर्ग परिसर निर्जंतुकीकरण करावे. विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देताना तसेच वर्ग संपल्यानंतर वर्गाबाहेर जाताना गर्दी होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी
- विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची संमती घेऊनच क्लासमध्ये बसण्याची परवानगी देण्यात यावी
- covid-19 सदृश्य लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येऊ नये त्यांची आवश्यक तपासणी करून उपचार घेण्याबाबत समुपदेशन करण्यात यावे
- सदर आदेश फक्त यावर्षी नीट 2021 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या ऑफलाइन सराव परीक्षा घेण्यासाठी लागू राहतील. या व्यतिरिक्त इतर वर्गासाठी लागू राहणार नाही
- या आदेशाद्वारे नीट 2021 ऑफलाईन सराव परीक्षेसाठी देण्यात आलेली परवानगीची वैधता नीट 2021 परीक्षा संपेपर्यंत राहील त्यानंतर सदर परवानगी आपोआपच रद्द समजण्यात येईल
- या आदेशाचे किंवा आदेशातील अटीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास सदरील आदेश रद्द करण्यात येऊन संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमामधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन 2021 परीक्षेबाबत चिंता करू नये, आणखी एक संधी दिली जाणार
- CISCE Result 2021 Declared : आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर! राज्याचा ICSE 10 वीचा निकाल 100 टक्के तर 12 वीचा 99 टक्के
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI