NEET UG : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट यूजीचा फेर निकाल जाहीर, अंतिम उत्तरतालिका जारी, रिझल्ट कुठं पाहणार?
NEET UG Revised Final Answer Key Out: नॅशनल टेस्टिंग एजेंसीने नीट युजी 2024ची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. ही अंतिम उत्तरतालिकेची फेर उत्तरतालिका आहे. यामध्ये फिजिक्सच्या वादग्रस्त प्रश्नाचे उत्तरही समाविष्ट आहे.
NEET UG Revised Final Answer Key Out: नॅशनल टेस्टिंग एजेंसीने नीट युजी 2024ची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. ही अंतिम उत्तरतालिकेची फेर उत्तरतालिका आहे. यामध्ये फिजिक्सच्या वादग्रस्त प्रश्नाचे उत्तरही समाविष्ट आहे. परिक्षार्थ अधिकृत वेबसाईटवर जात exams.nta.ac.in/NEET उत्तरतालिका डाऊनलोड करु शकतो. परिक्षार्थ नीट युजीच्या परिक्षेची रिवाइज्ड उत्तरतालिका चेक करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर जा आणि पुढील सूचना फॉलो करा.
परिक्षार्थींनी उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी जन्मतारिख देऊन लॉगिन करावे. त्यानंतर पुढील प्रक्रिया करताना स्क्रीनवर पुढील माहिती दिसेल. परिक्षेला बसलेल्या उमेदवाराची माहिती समोर येईल. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी NEET UG चा निकाल रद्द करणार आणि पुन्हा एकदा परीक्षा घ्या ही मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
NEET UG 2024 च्या परिक्षेत 23 लाखांपेक्षा जास्त उमेदवार
NEET UG 2024 च्या परिक्षेत 23 लाखांपेक्षा जास्त उमेदवार बसले होते. परिक्षेचा निकाल जाहीर होताच लोक एनटीएच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर ज्या उमेदवारांना सवलतीचे गुण मिळाले होते, त्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली, त्यानंतर टॉपर्सच्या संख्येत बदल झाला. ही परीक्षा 23 जूनला झाली होती, तर परीक्षेचा निकाल 30 जूनला जाहीर झाला होता. त्यानंतरही हे प्रकरण न्यायालयात असताना परीक्षा रद्द न करण्याचा अंतिम निर्णय देण्यात आला.
NEET UG Revised Final Answer Key Out : उत्तरतालिका कशी डाऊनलोड करणार?
निकाल जाहीर झाल्यानंतर कसा पाहाल?
नीटची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकता.
निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
येथे होमपेजवर NEET UG 2024 Result नावाची लिंक असेल, त्यावर क्लिक करा.
नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला तुमचा अॅप्लीकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल.
डिटेल्स टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
निकाल पाहिल्यानंतर बाजुला असलेल्या प्रिंट पर्यायावर क्लिक करुन तुम्ही प्रिंट काढू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या
NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर; कसा अन् कुठे पाहाल निकाल?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI