एक्स्प्लोर

NEET-UG 2022 Result : राजस्थानची कनिष्का ठरली ऑल इंडिया टॉपर! 56.3% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण 

NEET-UG 2022 Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी रात्री उशिरा NEET UG 2022 चा निकाल जाहीर केला.महाराष्ट्रातून ऋषि विनय बालसे या विद्यार्थ्याने 710 मार्क पटकावले आहेत.

NEET-UG 2022 Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी रात्री उशिरा NEET UG 2022 चा निकाल जाहीर केला. राजस्थानमधील कनिष्का या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पदवी 2022 परीक्षेच्या निकालात अव्वल स्थान पटकावले आहे. 17 जुलै रोजी झालेल्या या परीक्षेत देश-विदेशात एकूण 94.2% परीक्षार्थींची उपस्थिती नोंदवली गेली. तर महाराष्ट्रातून ऋषि विनय बालसे या विद्यार्थ्याने 710 मार्क पटकावले आहेत.

टॉपर्सची यादी

राज्य                 विद्यार्थ्यांचे नाव                   मार्क्स
राजस्थान            तनिष्का                           715
दिल्ली                वत्स आशीष बत्रा               715
कर्नाटक             ऋषिकेश गांगुली,              715
तेलंगाना             एराबेली सिद्धार्थ राव          711
महाराष्ट्र              ऋषि विनय बालसे            710
पंजाब-               अर्पित नारंग                    710
गुजरात              जील विपुल व्यास              710
जम्मू कश्मीर      हाजिक परवीज                 710
पश्चिम बंगाल       सायंतनी चटर्जी                710
आंध्र प्रदेश         मट्टा दुर्गा साई कीर्ति तेजा   710
गोवा                 अनुष्का आनंद कुलकर्णी    705
मध्यप्रदेश          सानिका अग्रवाल               705
तमिलनाडु         त्रिदेव विनायक                  705
उत्तर प्रदेश        एहसान अग्रवाल                705
हरियाणा            निशा                               705
ओडिशा            प्रिया सौम्यदत्त नायक         705
छत्तीसगढ़         ओम प्रभु                           701
केरल               नंदिता पी                          701

 18,72,343 उमेदवारांची नोंदणी
NTA च्या माहितीनुसार, यावर्षी NEET परीक्षेत सर्वाधिक 18,72,343 उमेदवारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 17,64,571, 94.2% परीक्षेसाठी उपस्थित होते आणि एकूण 993059 म्हणजेच 56.3% उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. NTA ने सांगितले की, 429160 पुरुष, 563902 महिला आणि सात ट्रान्सजेंडर हे अंडरग्रेजुएट स्तरावर एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरले.

"टाय-ब्रेकर" फॉर्म्युला वापरून रँक
राजस्थानमधील तनिष्का या विद्यार्थिनीने 99.99% गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. तर दिल्लीचा वत्स आशिष बत्रा आणि कर्नाटकचा हृषीकेश नागभूषण गांगुली यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. जरी त्याने 99.99% गुण मिळवले असले तरी, यावर्षी NTA ने "टाय-ब्रेकर" फॉर्म्युला वापरून रँक दिली आहे. 9,93,069 पात्र उमेदवारांपैकी 2,82,184 अनारक्षित श्रेणीतील, 4,47,753 OBC श्रेणीतील, 1,31,767 SC, 47,295 ST आणि 84,070 EWS श्रेणीतील होते. याशिवाय, अपंग प्रवर्गातील 2,717 उमेदवारही परीक्षेत पात्र ठरले आहेत.

विविध शहरात, विविध भाषेत परीक्षा

NTA ने एका निवेदनात म्हटले की, NEET-UG भारताबाहेरील 14 शहरांसह देशभरातील 497 शहरांमधील 3570 केंद्रांवर आयोजित केले गेले. ही परीक्षा प्रथमच अबू धाबी, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, क्वालालंपूर, लागोस, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर तसेच दुबई आणि कुवेत सिटी येथे घेण्यात आली. परीक्षा 13 भाषांमध्ये (आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू) घेण्यात आली. कोल्लम, श्रीगंगानगर, नागौर, कुशीनगर, भिंड, होशनगड, बेगुसराय आणि ठाणे येथील बाधित उमेदवारांसाठी पुनर्परीक्षा घेण्यात आली. परीक्षा फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत घेण्यात आली.

कसा पाहाल NEET-UG 2022 चा निकाल? 
-उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर भेट द्यावी.
-होम पेजवर दिलेल्या NEET UG निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा. 
-(रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड इत्यादी) मागितलेली माहिती सबमिट करा.
-निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
-तुम्ही डाऊनलोड करुन निकालाची प्रिंटही काढू शकता. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Embed widget