क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021 मध्ये देशात मुंबई आयआयटी प्रथम स्थानावर
जगभरातील पहिल्या हजार उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यापीठात भारतातील 21 शिक्षण संस्थाचा समावेश यंदाच्या वर्षीच्या क्यूएस रँकिंगमध्ये आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोरला भारतातील सर्वात उत्तम रिसर्च विद्यापीठाचा दर्जा या रँकिंगमध्ये मिळाला आहे.
मुंबई : क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021 मध्ये देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यापीठ, संस्थांमध्ये आयआयटी मुंबईने पहिले स्थान मिळविले आहे. मुंबई आयआयटीने या रँकिंगमध्ये पहिल्या दोनशेमध्ये स्थान मिळवले असून मागील वर्षीच्या रँकच्या तुलनेत मात्र मुंबई आयआयटीची रँक यंदाच्या वर्षी घसरलेली पाहायला मिळाली. मागील वर्षी मुंबई आयआयटीने क्यूएस रँकिंगमध्ये 152 वा स्थान मिळवले होते. तर यावर्षी मुंबई आयआयटीची रँकही 20 ने घसरून 172 वा रँक प्राप्त झाला आहे
याशिवाय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर 185 व्या स्थानी तर आयआयटी दिल्ली 193 व्या स्थानी आहे. जगभरातील पहिल्या हजार उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यापीठात भारतातील 21 शिक्षण संस्थाचा समावेश यंदाच्या वर्षीच्या क्यूएस रँकिंगमध्ये आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोरला भारतातील सर्वात उत्तम रिसर्च विद्यापीठाचा दर्जा या रँकिंगमध्ये मिळाला आहे.
क्यूएस वर्ल्ड रँकिंग 2021 मध्ये 275 व्या स्थानी आयआयटी मद्रास, 314 व्या स्थानी आयआयटी खरगपूर, 350 व्या स्थानी आयआयटी कानपूर, 383 व्या स्थानी आयआयटी रुरकी आणि 470 व्या स्थानी आयआयटी गुवाहाटीने स्थान मिळवले आहे. दिल्ली विद्यापीठाला 501 ते 510 च्या मध्ये स्थान मिळाले आहे . तर हैद्राबाद विद्यापीठ आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठाला 651 ते 700 च्या रँक मध्ये स्थान मिळाले आहे.
या वर्ल्ड रँकिंगमध्ये अमेरिकीतील विद्यापीठांचा दबदबा यावर्षी सुद्धा कायम राहिला आहे. अमेरिकेतील मैसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआईटी) ला जगात प्रथम स्थान या रँकिंग मध्ये मिळालं आहे. हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ असल्याचं यामध्ये समोर आलंय. एमआयटी नंतर स्टैनफोर्ड विद्यापीठ दूसरा तर हार्वर्ड विद्यापीठाला तीसरा स्थान प्राप्त आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI