एक्स्प्लोर

SSC & HSC Board Exam : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर जात आणली; संतापाचा कडेलोट होताच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष काय म्हणाले?

SSC & HSC Board Exam : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीच्या उल्लेखावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, बोर्डाच्या निर्णयावर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दहावी- बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्राबाबत (Maharashtra SSC Hall Ticket 2025) अपडेट समोर आली आहे. दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठीच्या हॉल तिकिटावरती आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला असल्याचं दिसून येत आहे. हॉल तिकीटवर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

काय म्हणालेत शरद गोसावी?

बारावीच्या हॅाल तिकीटावर विद्यार्थ्यांच्या जातीच्या उल्लेखावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख नाही. तर, प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे, ओबीसी, एसटी, एससी असा उल्लेख तिकिटावरती आहे. सामाजिक न्याय विभागाकडून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यात विद्यार्थ्यांना सोय व्हावी, अडचण येऊ नये यासाठी प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख फक्त दाखवल्यावर असतो. त्यात चुक झाली तर पुढील शिक्षणात अडचण येऊ शकते. ते टाळण्यासाठी हॅाल तिकीटावर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण शरद गोसावी यांनी फोनवरून दिले आहे. 

हेरंब कुलकर्णी यांची प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे. हॉल तिकीट हे तात्पुरते आहे, मग यावर जातीचा उल्लेख करण्याची गरज काय? आहे, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असताना, शाळा याची जबाबदारी पूर्णपणे घेत असताना, हॉल तिकिटावर उल्लेख करण्याचं कारण काय? असा सवाल हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या जातीच्या मुद्द्यावर समाज व्यवस्था तुटेल की काय? अशी अवस्था असताना असे निर्णय घेताना शिक्षण विभागाने विचार करायला हवा, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

10वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दाहवीच्या परीक्षेची प्रवेशपत्र (Maharashtra SSC Hall Ticket 2025) ऑनलाइन पद्धतीनं जारी करण्याची तारीख जाहीर झाली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 फेब्रुवारीला उपलब्ध होणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळाववरुन (Admit Card) लिंक (Link)व्दारे डाउनलोड (Download) करण्याकरिता उपलब्ध होणार आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Embed widget