Ajit Pawar: 'दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिलो असतो तर निवडून आलो असतो'; अजित पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केली खंत, नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar: लोकसभेला एका बाजूला आड दुसऱ्या बाजूला विहीर अशी परिस्थिती तुमच्यासमोर निर्माण झाली होती. त्यावेळी तुम्ही आडाला खुश केलं. पण आता विधानसभेला विहिरीला खुश करा, असं अजित पवार म्हणालेत.
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपला मतदारसंघ पिंजून काढत आहेत. गावभेट दौरे, प्रचार, सभा ते करताना दिसत आहेत. आज अजित पवार (Ajit Pawar) बारामतीमध्ये (Baramati) गावभेट दौरा, प्रचार दौरे करीत आहेत, यादरम्यान त्यांनी प्रथमच आपली खंत बोलून दाखवली. मी एवढ्या वर्षी मी एवढी कामे करून देखील मला एव्हढा त्रास झाला नाही. तो आता झाला आहे, एवढी कामे करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिला असतो तर निवडून आलो असतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
लोकसभेला एका बाजूला आड दुसऱ्या बाजूला विहीर अशी परिस्थिती तुमच्यासमोर निर्माण झाली होती. त्यावेळी तुम्ही आडाला खुश केलं. पण आता विधानसभेला विहिरीला खुश करा. आतापर्यंत आपण निवडणुकीमध्ये पवार साहेबांकडे पाहूनच मतदान मागत आलो आहोत. परंतु आता बघा, इथे फोटो पवार साहेबांचा लावला आहे. निवडणुकीला उभे कोण आहे. त्यांचा फोटो लावा ना. त्याच्या नावावर मत मागा असंही अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणालेत अजित पवार?
'बारामतीतील गाव भेट दौऱ्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, या पाच वर्षांमध्ये सर्वात जास्त काम झाली आणि या पाच वर्षात सर्वात जास्त काम होत असताना आणि पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जात असताना सगळ्यात जास्त कष्ट घ्यावे लागत आहेत. हे आकरितच झालं. हे जर काम मी दुसऱ्या तालुक्यात केलं असतं, तालुक्यात प्रचाराला देखील जावं लागलं नसतं. लोकांनी मला तिथून निवडून दिलं असतं. आता आमच्या घरातच अडचण झाली, आता घरातच फूट पडलेली असल्यामुळे तुम्हालाही कळेना इकडे आड तिकडे विहीर कसं काय करायचं. आता लोकसभेला तुम्ही आडाकडे बघितलं, आता विधानसभेला विहिरीकडे बघा म्हणजे आड पण खुश आणि विहीर पण खुश असं करा'.
'इथं मोठ्या बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो लावलाय. पण, साहेब निवडणुकीत उभे आहेत का? नाही, उभं कोण आहे, तर योगेंद्र पवार. त्याचा लावा की, मग फोटो. त्याच्या नावावर मत मागा. साहेबांकडे बघून इतकी वर्ष बारामतीने मतं दिलेलीच आहेत. 1967 सालापासून आत्तापर्यंत किती वर्षे झाली. जवळपास 57 वर्ष तुम्ही साहेबांकडे पाहून सर्वजण मतदान करत आलेला आहात ही फक्त आता सहानुभूती मिळवण्याची काम आहेत असेही अजित पवार पुढे म्हणालेत.
परत बारामतीकरांना पुन्हा वाली राहणार नाही...
बारामतीमध्ये गावभेट दौऱ्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'आम्ही नवीन लोकांना संधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 2 कोटी 30 लाख महिलांना थेट खात्यावर पैसे देतोय. झिरो बिल सर्वांना येणार आहे. हे करण्याकरता आपल्याला पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यात आणणं गरजेतं आहे. त्यासंदर्भात तुम्ही नेहमीच मला साथ दिली. पुन्हा एकदा मला आता साथ द्या. लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जंमत होईल. मी खोटं सांगत नाही, तुमच्या लक्षात येत नाही, काही भावनिक झालात तर त्यांची मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल, परत बारामतीकरांना पुन्हा वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलं मी दीड वर्षांनी निवडणूक लढविणार नाही आणि खासदार पण होणार नाही, त्यानंतर कोण बघणार आहे, त्यावर लक्ष्य द्या, कोण काम करेल त्याकडे पाहा', असंही यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI