Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल जाहीर! पण आता टेन्शन अकरावी सीईटी परीक्षेचं
राज्य बोर्डाच्या दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. पण, आता टेन्शन अकरावी सीईटी परीक्षेचं आहे.
मुंबई : राज्यात काल (शुक्रवारी 16 जुलै) दहावीचा निकाल जाहीर झाला. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्के, 100 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र, इतके गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे दहावीमध्ये चांगले गुण मिळाले म्हणून हुरळून न जाता सीईटी परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळवण्यासाठीची तयारी करावी लागणार आहे.
यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागला आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना 90 टक्के टक्केच्या वरती गुण मिळालेत. मात्र, हे गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे नामांकित कॉलेज मिळणार नाहीये. कारण तुम्हाला यंदाच्या वर्षी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर अकरावी सीईटी परीक्षेत सुद्धा तुम्हला चांगले गुण मिळवावे लागणार आहे. कारण त्या गुणांच्या आधारेच मेरीट लिस्टनुसार नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.
यावर्षी दहावीच्या निकलावर नजर टाकली तर
- राज्यात 100 टक्के घेणारे 957 विद्यार्थी आहेत.
- 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 1,04,633 विद्यार्थी आहेत.
- 85 ते 90 टक्के दरम्यान गुण घेणारे 1,28,174 विद्यार्थी आहेत.
- 90 ते 95 टक्के दरम्यान गुण घेणारे 1,85,542 विद्यार्थी आहेत.
मात्र, हे भरमसाठ गुण घेऊन सुद्धा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटीचं अग्निदिव्य पार करावं लागणार आहे. त्यासाठी उरलेल्या दिवसात पुन्हा एकदा तयारी करून चांगले गुण मिळवावे लागतील. राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर 100 गुणांची ओएमआर पद्धतीने ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 2 तासांचा वेळ दिला जाणार आहे.
गणित, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्र या विषयांचे प्रत्येकी पंचवीस गुण या शंभर गुणांच्या परीक्षेत समाविष्ट असतील. ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या परीक्षेचे नियोजन बोर्डाकडून केले जात आहे.
त्यामुळे 85, 90, 95, 100 टक्के गुण घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांना तुम्हला नामांकीत कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाहीये. त्यासाठी अकरावी सीईटीत सुद्धा अभ्यास करून जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे गुण चांगले मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका आणि सीईटीच्या तयारीला लागा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI