एक्स्प्लोर

SSC Examination 2023 :आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, बोर्डाकडून चोख व्यवस्था; दोन विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ

SSC Examination 2023 : आजपासून राज्यात दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, काही ठिकाणी कॉपीचे प्रकार घडले आहेत.

SSC Examination 2023 : राज्यात आजपासून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (Maharashtra Board) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला (SSC Exam) आजपासून सुरुवात झाली आहे. बोर्डाकडून परीक्षेसाठीची जय्यत तयारी करण्यात आली. या परीक्षेसाठी 15 लाख 77 हजार विद्यार्थी  बसले आहेत.   5000 केंद्रांवर ही परीक्षा पाडत आहे. यंदाची दहावीची परीक्षा 100 टक्के कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाकडून मोहीम राबवली जात आहे. कॉपीचे गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी प्रत्येक केंद्रावर घेतली गेली आहे. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात होते. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी पालकांनीदेखील परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, नाशिकमध्ये दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे. त्यादृष्टीने खबरदारी घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्येही ऑफलाइन परीक्षेबाबत उत्सुकता दिसून आली. 

नाशिकमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

आगासखिंड येथील माध्यमिक शाळेत दहावीत शिकणारे (SSC Exam) विद्यार्थी परीक्षेसाठी पांढुर्ली येथील परीक्षा केंद्राकडे येत असताना झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुभम रामदास बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे हे दोन मित्र पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आज (2 मार्च) आपल्या अॅक्टिव्हा या दुचाकीवरुन जात असताना आगासखिंड येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एच पी गॅसचा टँकरने धडक दिल्यामुळे या दोघांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

छ. संभाजीनगर विभागात 629 केंद्रांवर 1.80 लाख विद्यार्थी

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विभागात 629 केंद्रांवर 1.80 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर अनेक परीक्षा केंद्रावर रात्री उशिरापर्यंत परीक्षेसाठी तयारी सुरु होती. दहावीच्या लेखी परीक्षेला 2 हजार 614 शाळांतील 99 हजार 549 विद्यार्थी तसेच 80 हजार 661 विद्यार्थिनी असे एकूण 1 लाख 80 हजार 210 परीक्षार्थी 629 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. तर या परीक्षा दरम्यान प्रशासनाकडून कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकासह बैठेपथक नियुक्त करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसह महसूल पथकाची देखील या परीक्षांवर नजर असणार आहे. 

नाशिक विभागात एकूण 1 लाख 59 हजार परीक्षार्थी

नाशिक विभागात (Nashik Division) 1 लाख 59 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीचे आणि इतर गैरप्रकार टाळण्यासाठी नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात 4 अशा एकूण 16 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाद्वारे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 53 हजार 675 परीक्षार्थी

कोल्हापूर जिल्ह्यात (Kolahpur News) 136 परीक्षा केंद्रे निश्‍चित केली आहेत. त्यात मुख्य, उपकेंद्रांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 976 शाळांतील 53 हजार 675 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. 

लातूर जिल्ह्यात 38 हजार विद्यार्थी

लातूर जिल्ह्यातील 149  केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेला 38 हजार 155 विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडाव्यात, यासाठी 29 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, विभागीय मंडळाच्या वतीने परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

कॉपीमुक्त अभियान कागदावर?

कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून पावले उचलली जात असताना दुसरीकडे याच अभियानाचा बोजवारा उडालेला दिसत आहे.  हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथील  माध्यमिक आश्रम शाळेच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळाला. परीक्षा केंद्राच्या मागच्या बाजूने आणि खिडकीच्या जवळ कॉपी देताना नागरिक मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget