एक्स्प्लोर

SSC Result 2024 :दहावीच्या निकालात 38 शाळांना भोपळा, 100 टक्के निकाल किती शाळांचा लागला?

MSBSHSE SSC Result 2024 : राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या निकालात 38 शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे.

MSBSHSE SSC Result 2024 मुंबई  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE Pune ) दहावीच्या निकालाबाबत (SSC Result) पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली.  विद्यार्थ्यांना निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद माहिती देण्यात आली. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातून 15 लाख 60 हजार 154 नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी, 15 लाख 49 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला आहे.  25770 रिपीटर विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 25327 परीक्षेला बसले होते.तर 12958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  राज्यातील 38 शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला. तर, शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 9382 इतकी आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी दिली जाणार आहे. दहावीच्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं बोर्डाच्यावतीनं शरद गोसावी यांनी अभिनंदन केलं. दहावीची परीक्षा सहा विषयांसाठी घेण्यात येते. त्यापैकी बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीनं टक्केवारी जाहीर करण्यात येते.  दरवर्षी प्रमाणं यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर, नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं निकालात बाजी मारली आहे. जे विद्यार्थी पुनर्परीक्षेला पात्र ठरलेत त्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येईल.

राज्यातील 38 शाळांचा निकाल शुन्य टक्के: 

राज्यातील नऊ विभागांमध्ये शुन्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 38 आहे.

पुणे :6

नागपूर: 5

छत्रपती संभाजीनगर :5

मुंबई :5

कोल्हापूर :1

अमरावती: 7

नाशिक विभाग :3

लातूर  :6

कोकण विभागात एकाही शाळेचा निकाल शुन्य टक्के लागला नाही. 
 
राज्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या  : 9382

पुणे :1542

नागपूर: 1007

छत्रपती संभाजीनगर :840

मुंबई :1533

कोल्हापूर :1270

अमरावती: 1063

नाशिक विभाग :1006

लातूर  :608

कोकण :513

23288 शाळांची नोंदणी  

शंभर टक्के शाळा : 40.29  टक्के 

शुन्य टक्के निकाल शाळा :0.16

राज्यातील 187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. अतिरिक्त गुण घेऊन त्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत.  प्रश्न पत्रिका सोडवून एकाला ही 100 टक्के गुण मिळालेले नाहीत, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. 

दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर जाहीर होणार? 

https://mahresult.nic.in/ 

http://sscresult.mkcl.org   

https://sscresult.mahahsscboard.in 

https://results.digilocker.gov.in 

https://results.targetpublications.org

संबंधित बातम्या :

Maharashtra Board SSC Result : दहावीचा निकाल लागला! कोकण सर्वश्रेष्ठ, मराठवाड्याची काय स्थिती?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget