Maharashtra SSC Result: दहावीचे सव्वातीन लाख विद्यार्थी काठावर पास, तर साडेपाच लाख विद्यार्थ्यांना डिस्टिक्शंन!
10th Class Result Maharashtra: दहावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत गुणपत्रिका वितरीत केल्या जातील. दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. तत्पूर्वी शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसएससी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानुसार राज्यात यंदा दहावीच्या परीक्षेला (SSC exam Result 2024) बसलेले 95.81 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर नेहमीप्रमाणे मुलींनी दहावीच्या परीक्षेत बाजी मारली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींचा टक्का हा मुलांपेक्षा जास्त आहे. माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार आहे
दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
* यंदा दहावीची परीक्षा ही एकूण आठ भाषांमधून घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 72 विषय होते. 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला.
* नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक आणि कोकण या नऊ मंडळांमधून 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. यापैकी प्रत्यक्षात 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 14 लाख 84 हजार 441विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची ही टक्केवारी 95.81 टक्के इतकी आहे.
* 25 हजार 770 पुनपरीक्षार्थी अर्थात रिपीटर्स दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा नशीब आजमवत होते. यापैकी 25,327 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 12958 म्हणजे 51.16 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
* दहावीच्या परीक्षेला यंदा बाहेरून बसलेले म्हणजे 17 नंबरचे 25 हजार 894 विद्यार्थी बसले होते. यापैकी 20 हजार 403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांची ही टक्केवारी 80.42 टक्के इतकी आहे.
* नियमित, खासगी, दिव्यांग असे सगळे विद्यार्थी मिळून यंदा 16,21,000 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 17 हजार 802 म्हणजे 94.86 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाली.
* एकूण 9,078 दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 8,465 म्हणजे 93.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
* यंदा दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 99.01 टक्के इतका लागला. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला. नागपूर विभागात दहावीच्या परीक्षेत 94.93 टक्क विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
* दहावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. या परीक्षेत 97.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर 94.56 टक्के मुलं उत्तीर्ण झाली.
* यंदा दहावीच्या परीक्षेत 5 लाख 58 हजार 21 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह म्हणजे 75 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवले. तर 5 लाख 31 हजार 822 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याशिवाय, 3 लाख 14 हजार 866 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर 79,732 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले.
नऊ विभागीय मंडळांचा निकाल
पुणे-९६.४४%
नागपूर -९४.७३%
छत्रपती संभाजीनगर-९५.१९.%
मुंबई- ९५८३.%
कोल्हापूर- ९७.४५.%
अमरावती- ९५.५८%
नाशिक-९५.२८%
लातूर-९५.२७%
कोकण-९९.०१%
आणखी वाचा
दहावीचा निकाल लागला! कोकण सर्वश्रेष्ठ, मराठवाड्याची काय स्थिती?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI