Maharashtra Board Result 2023 LIVE Updates : ऑल द बेस्ट!!! बारावीचा निकाल जाहीर; दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार
Maharashtra HSC Result 2023 Live Updates: अवघ्या काही तासांत बारावीच्या परीक्षेचा निकाल, एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com बेवसाईटवर निकाल पाहण्याची सुविधा

Background
Maharashtra HSC Result 2023 Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
Maharashtra HSC Result 2023 Date : गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
Maharashtra HSC Result 2023 Date : बारावीचा निकाल एबीपी माझावर
आज दुपारी दोन वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती यंदा तुम्हाला एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.
14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.
कुठे पाहाल निकाल?
बारावीच्या निकालासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.
HSC Result 2023 LIVE Updates: महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के; पाहा विभागनिहाय टक्केवारी
- महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के.
- मुलींचा निकाल 93.73 टक्के
- मुलांचा निकाल 89.14 टक्के निकाल
- कोकण विभागाचा 96.1 तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 88.13 टक्के.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल घटला.

HSC Result 2023 LIVE Updates : 1416371 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली, त्यापैकी 1292468 विद्यार्थ्यी उत्तीर्ण, राज्याचा निकाल 91.25 टक्के
HSC Result 2023 LIVE Updates : 1416371 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली, त्यापैकी 1292468 विद्यार्थ्यी उत्तीर्ण, म्हणजेच, राज्याचा निकाल 91.25 टक्के
पुनर्परिक्षार्थि ( रिपीटर ) निकालाची टक्केवारी : 44.33 टक्के
खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 82.39 टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 93.43 टक्के























