एक्स्प्लोर

Medical College In Maharashtra: राज्यात नवी 9 वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Medical College In Maharashtra: राज्य मंत्रिमंडळाने राज्यात नवी 9 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

Medical College In Maharashtra:  देशाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नागरीकांना उच्च दर्जाच्या वैदयकीय सेवा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने AIIMS ची संख्या 7 वरुन 22 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरुन 654 इतकी वाढली आहे. तसेच MBBS च्या जागांची संख्या सुमारे 51 हजारवरुन सुमारे एक लाखांवर गेली आहे. त्यास अनुसरुन राज्याच्या प्रत्येक जिल्हयात शासकीय वैदयकीय महाविदयालये सुरु करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.  त्याच दृष्टीने राज्य सरकारने 9 जिल्ह्यात नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 

राज्यामध्ये डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी तसेच गोरगरीब विदयार्थ्यांना माफक दरात वैदयकीय शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी सन 2014 पासून शासकीय वैदयकीय महाविदयालये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 
या प्रयत्नातून सन 2014 पासून ते आजतागायत असे मागील 9 वर्षामध्ये नवीन 10 शासकीय वैदयकीय महाविदयालये स्थापन झालेली आहेत. यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, जळगांव, बारामती, सातारा, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, अलिबाग या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहे. 

रत्नागिरी जिल्हयातील शासकीय वैदयकीय महाविदयालयास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाली असून यावर्षी सदर महाविदयालय सुरु होत आहे. परभणी व नाशिक जिल्हयात शासकीय वैदयकीय महाविदयालय सुरु करण्याबाबतच्या प्रस्तावास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर ती देखील लवकरच सुरू होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ज्या जिल्ह्यात शासकीय वैदयकीय महाविद्यालये नाहीत अशा ठाणे, पालघर, जालना, बुलढाणा, अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, वर्धा या 9 जिल्हयात प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैदयकीय महाविदयालये सुरु करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये निर्मितीसाठी आशियाई विकास बॅक (ADB) तसेच जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) अशा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडून वित्त विभागाच्या सहमतीने अल्प व्याजदरात अर्थ सहाय्य उपलब्ध करुन घेण्यास देखील मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे.

हिंगोली, अहमदनगर, मुंबई उपनगर या तीन जिल्हयांमध्ये जागा उपलब्ध करण्यामध्ये अडचणी येत आहेत मात्र तेथे जागा उपलब्ध करुन घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. सदर ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

मुंबई उपनगर या जिल्ह्यात मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविदयालय आधीपासूनच अस्तित्वात आहे. नवीन शासकीय वैदयकीय महाविद्यालयांमुळे पुढील 4 वर्षामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या सुमारे 1200 जागा निर्माण होऊन सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची संधी अतिशय कमी शुल्कामध्ये उपलब्ध झालेली आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Embed widget