एक्स्प्लोर

Pakistani Spies in Amritsar : मोठी बातमी! अमृतसरमधून ISI च्या दोन गुप्तहेरांना बेड्या, भारतीय लष्कराची गोपनीय माहिती...

Pakistani Spies in Amritsar : अमृतसरमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय लष्कर आणि अमृतसर एअरबेसची माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे.

Pakistani Spies in Amritsar : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानशी वाढत्या वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना पकडण्यात आले आहे. अमृतसर ग्रामीण पोलिसांनी पलक शेर मसीह आणि सूरज मसीह नावाच्या दोघांना अटक केली आहे, ज्यांच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे गुप्तहेर असल्याचा आरोप आहे.

आरोपी पाकिस्तानी गुप्तहेर हे अमृतसरमध्ये राहून भारतीय लष्कर आणि अमृतसर एअरबेसशी संबंधित माहिती पाकिस्तानला देत होते. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी अमृतसर तुरुंगात बंद असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ ​​हॅप्पी मार्फत या लोकांशी संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे. 

सैन्याच्या हालचालींवर ठेवून होते लक्ष

आरोपी सूरज मसीह आणि पलक शेर मसीह हे अमृतसरच्या बलहडवाल येथील रहिवासी आहेत. पोलीस तपासात हे दोन्ही गुप्तहेर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आयएसआय एजंट फोनद्वारे सैन्याच्या हालचाली, अमृतसर एअरबेसचे फोटो आणि व्हिडिओ आयएसआयला पाठवत होते. यासाठी त्यांना सिम कार्ड आणि फोन देण्यात आला होता.

अमृतसर पोलिसांकडून सखोल तपास 

या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात असल्याचे अमृतसर पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही आरोपींनी आतापर्यंत पाकिस्तानला कोणती माहिती दिली आहे आणि त्यामागे त्यांचा हेतू काय होता? याचा तपास केला जात आहे. या कृत्यात त्यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. या आयएसआय एजंट्सकडून आर्मी कॅन्टोन्मेंट आणि एअरबेसबद्दल माहिती असलेली कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. तसेच काही छायाचित्रे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींचा पाकिस्तान गुप्तचर संस्थेशी काय संबंध आहे? याची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी करून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातून व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. तर आयात-निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या 26 लोकांचा बदला पाकिस्तानकडून लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी देशभरातून होत आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकार घाबरलेल्या स्थितीत आहे आणि त्यांचे सैन्य सीमेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे. युद्धबंदीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याला सतत चोख प्रत्युत्तर देत आहे. 

आणखी वाचा 

Bilawal Bhutto on Indus Water Treaty : सिंधू नदीत रक्त सांडू म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंचा यू-टर्न; म्हणाले, मी सीमारेषेवर हातात बंदूक घेऊन...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल

व्हिडीओ

Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Suniel Shetty Majha Maha Katta : मराठी सक्ती ते फिटनेस फंडा; सुनील शेट्टीचा माझा महा कट्टा
Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Shiv Sena UBT on Jain Muni: जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
Goa Fire News: स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
Virat Kohli : 2-3 वर्षांत असा खेळलोच नव्हतो..., स्वतःला पुन्हा सिद्ध करत विराट कोहलीने टीकाकारांना दिलं उत्तर, जिंकला प्लेयर ऑफ द सिरीज
2-3 वर्षांत असा खेळलोच नव्हतो..., स्वतःला पुन्हा सिद्ध करत विराट कोहलीने टीकाकारांना दिलं उत्तर, जिंकला प्लेयर ऑफ द सिरीज
Embed widget