राम शिंदे, पवारांना चॅलेंज करु नका, रोहित संतापले; म्हणाले, भविष्यात कर्जत जामखेडमधूनच राज्यातील प्रमुख निर्णय होणार
Rohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे (Ram Shinde) चॅलेंज करायचे असेल तर कुणाला पण करा पण पवारांना करु नका असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.
Rohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे (Ram Shinde) चॅलेंज करायचे असेल तर कुणाला पण करा पण पवारांना करु नका असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. कर्जत- जामखेडमध्ये IPL च्या मॅचेस होणार का? असे राम शिंदे म्हणतात, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, आम्हाला चॅलेंज करू नका, तुम्हाला IPL चे साधे तिकीट तरी मिळते का? ते पाहा असेही रोहित पवार म्हणाले. कर्जत जामखेडमध्ये (Karjat Jamkhed) आयोजीत केलेल्या सभेत रोहित पवारांनी (Rohit Pawar) राम शिंदेंवर ( Ram Shinde) देखील जोरदार टीका केली.
भविष्यात कर्जत जामखेडमधूनच राज्यातील प्रमुख निर्णय होणार
पाच वर्षात मी या मतदारसंघात जे काम केलं तो केवळ ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है असेही रोहित पवार म्हणाले. कर्जत- जामखेडच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची दखल राज्याला घ्यावी लागली असेही ते म्हणाले. कर्जत- जामखेडचे वजन हे राज्यात वाढले आहे. भविष्यात कर्जत जामखेडमधूनच राज्यातील प्रमुख निर्णय घेतले जातील असंही रोहित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस पहाटे शपथविधी करतात तसेच राम शिंदेंकडे प्रवेश हे रात्रीचे होत आहेत. आम्ही दिवसा ढवळ्या काम करतो.यापुढं आम्ही गद्दारांना सोडणार नाही असेही रोहित पवार म्हणाले. माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला तर त्यांचे हात छाटण्याचे काम आम्ही करु असा इशारा देखील रोहित पवारांनी दिली.
पवार साहेबांनी 10 वर्षात काय केलं? हे 23 तारखेला लोक दाखवतील
देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदेंना सांगितले होते की, काहीही कर रोहित पवारांना मतदारसंघात अडकवून ठेव पण त्यांना ते करता आलं नाही असेही ते म्हणाले. पवार साहेबांनी 10 वर्षात काय केलं? असं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विचारले होते, लोक 23 तारखेला दाखवून देतील पवार साहेबांनी काय केलं ते असेही रोहित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे 170 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, माझ्याकडे जर चुकून गृहमंत्रीपद (Home Minister) आलं तर महायुतीतील 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील असं वक्तव्य देखील आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं. येत्या काळात महाविकास आघाडीचा कोणीही गृहमंत्री झाला तरी महायुतीतील नेत्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे देणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
माझ्याकडं गृहमंत्रीपद आलं तर महायुतीचे 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील, रोहित पवारांचा हल्लाबोल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI