Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024 : 370 कलम हटवल्यानंतर काश्मिरी लोकांचा कल कुणाला? मतमोजणीचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Jammu Kashmir Assembly Election Results Live Updates 2024 : जम्मू काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान झालं असून त्याच्या निकालाचे ताजे अपडेट्स यावर पाहता येतील.

Background
Jammu Kashmir Vidhan Sabha Results Live Updates : जम्मू काश्मीरच्या 90 जागांसाठी झालेल्या मतदानासाठी आता मतमोजणी होत असून एक हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य काहीच वेळात स्पष्ट होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ही निवडणूक घेण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये किती टक्के मतदान झालं?
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका झाल्या. येथे पहिल्या टप्प्यात 61.38 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 57.31 टक्के आणि शेवटच्या टप्प्यात 68.72 टक्के मतदान झाले. एकूण मतदानाची टक्केवारी 63.45 आहे जी 2014 च्या तुलनेत सुमारे दोन टक्के कमी आहे.
जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर आणि तेथून कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आले आहे.
भाजपसाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे कारण त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचवेळी या दोन्ही निर्णयांना विरोध करणारी काँग्रेस यावेळी नॅशनल कॉन्फरन्ससोबत निवडणूक लढवत आहे. पीडीपी एकट्याने निवडणूक लढवत आहे. याशिवाय काही प्रादेशिक पक्षांनीही उमेदवार उभे केले आहेत. याकडे स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचेही लक्ष लागले आहे.
निवडणुकीचे अचूक निकाल पाहण्यासाठी, एबीपी न्यूजच्या विविध प्लॅटफॉर्मशी कनेक्ट रहा. क्षणोक्षणी अपडेट्स लाइव्ह टीव्ही, एबीपी न्यूजच्या हिंदी आणि इंग्रजी वेबसाईटवर, एबीपी नेटवर्कच्या यूट्यूब चॅनेलवरही पाहता येतील.
कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसने एकत्र निवडणूका लढविल्या आहेत. तर पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी आणि भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढली आहे.























