एक्स्प्लोर

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरच्या विविध पदांसाठी भरती, तपशील जाणून घ्या

Indian Navy SSC Officer Recruitment 2021: भारतीय नौदलाच्या (Indian Navy) या 181 पदांवर ऑनलाइन अर्ज (Online Application) की करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल.

Indian Navy SSCO Recruitment 2021: भारतीय नौदलात (Indian Navy) करिअर (Career) करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसरच्या (SSC Officer) 181 पदांसाठी जाहिरात जारी केली आहे. अभियांत्रिकी (Engineering)  पदवी पूर्ण केलेले पुरुष आणि महिला उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. नौदलाच्या नियमांनुसार या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

भरतीच्या महत्वाच्या तारखा
भारतीय नौदलाच्या अधिसूचनेनुसार 181 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. सर्व उमेदवारांनी 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज फी जमा करावी. सध्या भरती परीक्षेची तारीख निश्चित झालेली नाही.

अर्ज करण्यासाठी पात्रता निकष काय आहे? 
तांत्रिक शाखेच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 60 टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये बी टेक (B.Tech) किंवा त्याच्या समकक्ष अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. शिक्षण शाखेच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी, 55% गुणांसह एमए पदवी पूर्ण केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. याबद्दल अधिक माहितीसाठी, आपण भरती अधिसूचना पाहू शकता.

वयोमर्यादा आणि अर्ज फी
वयोमर्यादेबद्दल बोलताना, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांची जन्मतारीख 2 जुलै 1997 ते 1 जानेवारी 2003 दरम्यान असावी. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. सर्व श्रेणींसाठी अर्ज विनामूल्य आहेत.

याप्रमाणे अर्ज करू शकता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत भरती वेबसाइट www.joinindiannavy.gov.in ला भेट द्यावी लागेल. तिथं त्यांना या भरतीची अधिसूचना मिळेल, डाऊनलोड केल्यानंतर ते नीट वाचा. यामध्ये तुम्हाला अर्जाच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती मिळेल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget