एक्स्प्लोर

Admission : बारावीचा निकाल लागताच आता मिशन अॅडमिशन, मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

HSC Result : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 27 मे पासून सुरू करण्यात येणार आहे

HSC Result : राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होताच मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले. 27 मे पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन  नाव नोंदणीला सुरुवात होणार आहे. 

कसे असणार मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक?

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 27 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. 

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :

अर्ज विक्री – 27 मे ते 12 जून 2023 (दुपारी 1वाजेपर्यंत)

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 27 मे ते 12 जून 2023 (दुपारी 1 वाजेपर्यंत)

अॅडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – 27 मे ते 12जून 2023 (दुपारी 1 वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश  या कालावधीत करता येईल.

पहिली गुणवत्ता यादी – 19 जून 2023 ( सकाळी 11 वाजता)

  • ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) –20 जून ते 27 जून 2023(दुपारी 3 वाजेपर्यंत )

द्वितीय गुणवत्ता यादी – 28 जून 2023  ( सायं. 7 वाजता)

  • ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे  – 30 जून ते 5 जुलै 2023 ( दुपारी 3 वाजेपर्यंत)

तृतीय गुणवत्ता यादी -  6 जुलै 2023 ( सकाळी 11 वाजता )

  • ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे  – 7 ते 10 जुलै 2023 

पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतुदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील.  
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम  https://mumoa.digitaluniversity.ac/  या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. 

 ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  •  विद्यार्थ्यांने स्वतःबद्दलची माहिती भरुन नोंदणी करणे
  •  एकदा अचूक माहिती भरल्यावर दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.
  • युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होताच विद्यार्थ्यांने सर्वप्रथम स्वतःबदलची माहितीची खातरजमा करुन पासवर्ड बदलण्याची मूभा देण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या युजरआयडी आणि पासवर्ड किवा बदलेल्या पासवर्डच्या मदतीने सर्वप्रथम स्वतःबद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता, इ. माहिती भरावयाची आहे. 
  • त्यानंतर स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
  • Confirm Profile वर क्लिक करून माहितीची खातरजमा करता येईल.
  • ऑनलाईन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमुद केलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्याने निवडायचे आहेत. सोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज भरताना खालील बाबींकडे लक्ष द्या

  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्स (प्रोग्राम) साठी करता येईल.
  • विद्यार्थ्यांने शिक्षणक्रम निहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य त्या दस्ताऐवजासह सादर करावयाची आहेत.
  •  विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.
  •  विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे  अधिकार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना असतील याची नोंद घ्यावी.
  •  प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही नमूद केलेल्या कालावधीत होणे गरजेचे आहे.
  • विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही.

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget