एक्स्प्लोर

HSC Result : लातूर- अमरावतीमध्ये मुलींची बाजी, लातूर बोर्डाचा 90.37 टक्के तर अमरावतीचा 92.75 टक्के निकाल

HSC Result 2023 : लातूर आणि अमरावती विभागामध्ये मुलींनी बाजी मारली असून या विभागांचा निकाल अनुक्रमे 90.37 टक्के इतका लागला आहे.

मुंबई: बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून राज्यभरातून 91.25 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 96.1 टक्के तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 88.13 टक्के इतका लागला आहे. लातूर बोर्डाचा निकाल 90.37 टक्के आणि अमरावती विभागाचा निकाल 92.75 टक्के इतका लागला आहे. या दोन्ही विभागात मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलं आहे. 

लातूर बोर्डाचा 90.37 टक्के निकाल, निकालात मुलींची बाजी

लातूर बोर्डाचा निकाल 90.37 टक्के इतका लागला असून मुलीचे पास होण्याचे प्रमाण हे 94 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं आहे. लातूर बोर्डांतर्गत लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात लातूर जिल्ह्याचा निकाल 92.66 टक्के इतका लागला आहे. उस्मानाबाद जिल्हा 89.75 टक्के आणि नांदेड जिल्ह्याचा निकाल 88.56 टक्के लागला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे दिसत आहे. मुलीची पास होण्याची टक्केवारी 94.16 इतकी आहे तर मुलांची 87.32 टक्के आहे. लातूर विभागाच्या निकालावर सर्व राज्याचे लक्ष लागलेले असते. कारण राज्यभरातून येथे विद्यार्थी येत असतात. या वर्षी एकूण 88,051 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्या पैकी 79,572 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल 90.37 टक्के लागला आहे.

अमरावती विभागाचा निकाल 92.75 टक्के 

अमरावती विभागाचा 92.75 टक्के निकाल लागला असून राज्यात हा विभाग चौथ्या क्रमांकावर आहे. अमरावती विभागात एकूण 1 लाख 38 हजार 564 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 28 हजार 521 विद्यार्थी पास झाले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखेचा गोषवारा बघता निकालात मुलीच आघाडीवर आहे. अमरावती विभागात सर्वाधिक निकालात वाशिम जिल्ह्याने बाजी मारली. वाशिम जिल्ह्याचा 95.45 टक्के निकाल लागला असून बुलढाणा जिल्हा 93.69 टक्के, अकोला जिल्हा 93.11 टक्के, यवतमाळ जिल्हा 91.98 टक्के आणि सर्वात कमी अमरावती जिल्ह्याचा नंबर आहे. अमरावती जिल्ह्याचा निकाल 90.78 टक्के निकाल लागला आहे.

विभागात किती विद्यार्थ्यांना किती टक्के मिळाले

अमरावती विभागात 14 हजार 15 विद्यार्थी यांना 75 टक्केच्या वरती गुण मिळाले तर 45 हजार 456 विद्यार्थ्यांना 60 ते 75 टक्के आसपास गुण मिळाले. तसेच 53 हजार 985 विद्यार्थ्यांना 35 ते 60 टक्केच्या आसपास गुण मिळाले आणि 15 हजार 65 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहे.

नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के 

या वर्षी नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील वेदांत संदीप काकानी आणि आर्या राऊड  या दोघांना 97.67 टक्के गुण मिळाले आहेत. ते महाविद्यालयातून पहिले आले आहेत. अनुरीम पौणिकर हिने विज्ञान शाखेत 95.05 टक्के गुण घेतले तर अनुष्का चवरे हिला कला शाखेत 90.17 गुण मिळाले.

मुंबई विभागातून पालघर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर, 90.76 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 92.59 मुली उत्तीर्ण 

उच्च माध्यमिक (बारावी ) परीक्षेच्या निकालात मुंबई विभागातून पालघर जिल्ह्यातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे  प्रमाण 90.76 टक्के असून मुंबई विभागात निकालाची टक्केवारीमध्ये पालघर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्ह्यात 92.59 मुलींनी उत्तीर्ण होऊन बाजी मारत सलग तीन वर्षे मुलींनी जिल्ह्यात टक्केवारी राखली आह. पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यातील मोखाडा या अतिदुर्गम भागातील 94.73 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊन मोखाडा तालुका जिल्ह्यात प्रथम स्थानी आला आहे.

पालघर जिल्ह्यातून 27 हजार 416 मुले आणि 22 हजार 386 मुली अशा 49 हजार 448 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यात 24 हजार 277 मुलं आणि 20 हजार 602 मुली असे एकूण 44 हजार 879 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 92.59 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर 89.24 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यावर्षीसुद्धा उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के; पाहा विभागनिहाय टक्केवारी

  • महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के.
  • मुलींचा निकाल 93.73 टक्के
  • मुलांचा निकाल 89.14 टक्के निकाल
  • कोकण विभागाचा 96.1 तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 88.13 टक्के.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल घटला.
  • 1416371 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 1292468 विद्यार्थ्यी उत्तीर्ण, म्हणजेच, राज्याचा निकाल 91.25 टक्के
  • पुनर्परीक्षार्थी ( रिपीटर ) निकालाची टक्केवारी : 44.33 टक्के
  • खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 82.39 टक्के
  • दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 93.43 टक्के

ही बातमी वाचा : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dual Voting: भाजप नेत्याचं दोन राज्यांत मतदान? सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद
Raigad Save Land: रायगडात ठाकरोली गावाचा आदर्श, जमिनीच्या विक्रीवर बंदी
Onion Export Crisis: कांद्यामुळे शेतकरी हवालदिल, निर्यातबंदीवर तोडगा कधी?
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News |  ABP Majha
JCB Wedding : कोल्हापुरात JCB मधून नवदाम्पत्याची वरात, हटके मिरवणुकीची जोरदार चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Embed widget