एक्स्प्लोर

संततधार पावसामुळे बारावीच्या निकालाचे काम रखडले; कामासाठी अतिरिक्त चार-पाच दिवस वाढवून देण्याची शिक्षकांची मागणी

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे बारावी निकाल तयार करण्याचे काम रखडले आहे. बारावीच्या निकालाचे काम करण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीनं करण्यात आली आहे. 

मुंबई : यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बारावी परीक्षा रद्द करुन दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण एकत्र करुन अंतर्गत मूल्यपामनद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निकाल तयार करण्याचे काम सुरू असताना मागील तीन ते चार दिवसापासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे निकालाच्या कामात अडचणी येत असून त्यासाठी आणखी चार-पाच दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे.

सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शिक्षकांना कॉलेजमध्ये येऊन बारावीच्या निकालाचे काम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय, बारावीच्या शिक्षकांना 23 जुलैपर्यंत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत दिलेली आहे. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे यामध्ये चार ते पाच दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन व गुणतक्ते वर्ग शिक्षकाकडे सादर करण्यासाठी सात दिवस तर  वर्ग शिक्षकांना परीक्षण व नियमन करण्यासाठी नऊ दिवस दिले होते. त्याची मुदत काल संपली असून अद्याप काही ठिकाणी हे काम संपलेले नाही. मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्यासाठी केवळ पाच दिवस दिलेले असून त्याची मुदत परवा 23 जुलै रोजी संपत आहे. मंडळाची संगणकीय प्रणाली त्यानंतर बंद होणार असल्याचे कळवण्यात आले आहे. संगणकीय प्रणाली मध्ये गुण भरण्याचे काम खूप कमी प्रमाणात झाले असून ते 21 जुलै पर्यंत पूर्ण होणार नाही. 

बारावीचे शिक्षक अत्यंत परिश्रमपूर्वक हे काम करीत आहेत. रात्रंदिवस एक करुन , कॉलेजमध्ये मुक्काम करुन निकाल तयार केले जातायेत. पण आता मुसळधार पावसामुळे इंटरनेट, वीज खंडित होत आहे. वाहतुकीची साधने नसल्यामुळे, वाहतुकीची कोंडी व वाहतूक अत्यंत मंदगतीने चालत असल्याने शिक्षक शाळा महाविद्यालयात पोचू शकत नाहीत, अत्यंत उशिराने पोचत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेला  कालावधी अत्यंत अपुरा पडत असून या कालावधीमध्ये  शिक्षकांना मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये गुण भरणे शिक्षकांना शक्य होणारे नाही, असे मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. तर 'बारावीच्या शिक्षकांना मुळातच कमी कालावधी दिलेला होता तरी बारावीचे शिक्षक अत्यंत मेहनतीने हे काम करीत होते परंतु आता मागील तीन दिवसात हे काम अत्यंत संथ झाले आहे, त्यामुळे शासनाने यासाठी किमान चार दिवसाची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे व गुण भरण्यासाठी मंडळाची संगणकीय प्रणाली 23 जुलै नंतरही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे' असं एसएनडीटी महाविद्यालयाचे शिक्षक शरद गिरमकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget