एक्स्प्लोर

Coronavirus Today : देशात 125 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, तर 374 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Today : देशात 125 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, तर 374 रुग्णांचा मृत्यू कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 1.68 टक्के, तर देशाचा रिकव्हरी रेट 97.37 टक्क्यांवर पोहोचला

Coronavirus Today : देशात आज 125 दिवसांनी कोरोना व्हायरसच्या सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज 30 हजार 93 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 1.68 टक्के आहे. देशात काल (सोमवारी) 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी आकडेवारी आणि आतापर्यंतची लसीकरणाची आकडेवारी. 

आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 कोटी 11 लाख 74 हजार 322 वर पोहोचला आहे. अशातच सोमवारी 374 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण 4 लाख 14 हजार 482 वर पोहोचली आहे. देशात 45 हजार 254 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 3 लाख 53 हजार 710 वर पोहोचली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 6 हाजर 130 वर पोहोचला आहे. 

देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 52 लाख 67 हजार 309 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा 41 कोटी 18 लाख 46 हजार 401 वर पोहोचला आहे. 

आयसीएमआरनं ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरससाठी 17 लाख 92 हजार 336 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 44 कोटी 73 लाख 41 हजार 133 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. 

राज्यात सोमवारी 6017 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, अॅक्टिव रुग्णसंख्या एक लाखाच्या खाली

राज्यात काल (सोमवारी)  6 हजार 17 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्याच्या दुप्पट रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. काल राज्यात 13 हजार 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 93 हजार 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के आहे. 

राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या ही एक लाखाच्या खाली आली आहे. राज्यात सध्या 96 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात काल 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे.

तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. जालना (39), हिंगोली (67), यवतमाळ (25), गोंदिया (60), चंद्रपूर (49)  या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

मुंबई, पुण्यातील कोरोनाची सद्यस्थिती

मुंबईत गेल्या 24 तासात 402 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 577 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,07,129 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,349 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1034 दिवसांवर गेला आहे. 

तर पुणे महापालिका क्षेत्रात आज 196 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 289 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 2855 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल (सोमवार) एकूण सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद पुणे महापालिका क्षेत्रात करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pegasus Spying: 'भारतात कुणाचीही हेरगिरी नाही, सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित', भारत सरकारचं स्पष्टीकरण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकीचा रोष, कुणाचा दोष; ई केवायसीमुळे किती नाव कपात झाली? Special Report
Anjali Bharati On Amruta Fadnavis: प्रसिद्धीसाठी किती खालची पातळी गाठणार? Special Report
Chandrapur Mahapalika : चंद्रपुरात सत्ता? ठाकरेंकडे पत्ता; ठाकरेंची शिवसेना किंगमेकर Speicial Report
Jitendra Awhad Vs Sahar Sheikh : कैसे हराया VS चॉकलेट लाया; हिरवा, तिरंगा आणि राजकारण Special Report
Zero Hour Full : निवडणुकीनंतर महापौर निवडीची प्रतीक्षा, भाजप काँग्रेसमधील कोणत्या गटाच्या संपर्कात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
Embed widget