GSI Recruitment 2022 : दहावी पास तरुणांसाठी नोकरी सुवर्ण संधी, लवकर करा अर्ज
GSI Group C Recruitment 2022 : या भरती अंतर्गत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. उमेदवारांना त्यांचा अर्ज भरुन दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.
GSI Vacancy 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची (Govt Job) संधी चालून आली आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) विभागाकडून विविध पदांवर भरती (GSI Recruitment 2022) करण्यात येणार आहे. GSI नं रिक्त पदांवरील भरतीसाठी अधिसूचना (GSI Group C Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्घत विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी 13 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीमध्ये ऑर्डिनरी ग्रेड ड्रायव्हर, ग्रुप सी या पदांवर भरती करण्यात येईल. यासाठी उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवार gsi.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करु शकतात.
रिक्तस जागांचा तपशील
या भरती अंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील ड्रायव्हरच्या 13 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. त्यामध्ये आठ पदं सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तीन पदं इतर मागासवर्गीयांसाठी, एक पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आणि एक पद आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव आहे. या पदांसाठी भरतीसाठी निवड स्पर्धा परीक्षेच्या आधारे केली जाईल.
वयोमर्यादा
गट क पदांच्या भरतीसाठी वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता
भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे हलकी मोटार आणि जड मोटार वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
पगाराचे तपशील
या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर 2 अंतर्गत त्यांच्या पदानुसार 19,900 रुपये ते 63,200 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून अर्जामध्ये योग्य आणि अचूक माहिती लिहून तो खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. पत्ता - अतिरिक्त महासंचालक आणि एचओडी, पूर्व क्षेत्र, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, ब्लॉक DK, सेक्टर-II, सॉल्ट लेक सिटी, कोलकाता -700091.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI