Education : शाळांमध्ये चित्रपट, नाटक, लघुपट दाखवणार ,शिक्षण विभागाकडून धोरण निश्चित
Department of Education News : राज्यातील शाळांमध्ये चित्रपट, लघुपट, नाटक, ई शैक्षणिक साहित्य दाखवण्यासाठीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
Department of Education News : राज्यातील शाळांमध्ये चित्रपट, लघुपट, नाटक, ई शैक्षणिक साहित्य दाखवण्यासाठीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता एका शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त तीन चित्रपट, लघुपट, नाटक, ई शैक्षणिक दाखवता येणार आहेत. त्यापैकी दोन मराठीतील असणे बंधनकारक आहे. शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण घेता येण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित होण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये चित्रपट, लघुपट, नाटक, ई शैक्षणिक साहित्य दाखवण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र विविध विषयांशी संबंधित चित्रपट, लघुपट दाखवण्यासाठी परवनागी देण्याचे प्रस्ताव येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रक, अभ्यासावर परिणाम होणार नाही हे लक्षात घेणेही आवश्यक आहे. त्या अनुषंगाने चित्रपट, लघुपट, नाटक, ई शैक्षणिक साहित्य दाखवण्यासाठीचे धोरण ठरवण्यात आले आहे.
ई शैक्षणिक साहित्य हे ऐतिहासीक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक इत्यादी विषयाशी संबधीत
एका शैक्षणिक वर्षामध्ये दाकवण्यात येणाऱ्या साहित्याचे विषय पूर्णपणे वेगळे असणं गरजेचं आहे. ई शैक्षणिक साहित्य हे ऐतिहासीक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक इत्यादी विषयाशी संबधीत असावे. मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करता यावं. सर्व शाळांमध्ये ई शैक्षणिक साहित्य दाखवण्याची परवानगी ही फक्त 1 वर्षच राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ होणार नाही. ई शैक्षणिक साहित्य प्रस्तावाची तपासणी करुनच परवानगी देण्यात येणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI