(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अकरावीची विशेष फेरी लांबणीवर, एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस वर्गातून प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ
अकरावीची विशेष फेरी पुन्हा लांबणीवर पडली आहे. एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस वर्गातून प्रवेश घेण्यासाठी अर्जात बदल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : अकरावीच्या विशेष फेरी जाहीर होत असताना पुन्हा एकदा ही विशेष फेरी लांबणीवर गेली आहे. बुधवारी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी 24 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तिसऱ्या फेरीनंतर मुंबई विभागात अद्याप कोट्याच्या जागा वगळून तब्बल 1 लाख 48 हजार 386 जागा रिक्त आहेत. विशेष फेरीची गुणवत्ता यादी 28 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार असून 31 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करता येतील. ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रवेश घेतले आहेत. मात्र, आता रद्द करायचे आहेत, अशांना ते या फेरीत रद्द करता येणार असून लगेचच विशेष फेरीसाठी अर्ज करता येणार आहे.
मुंबई विभागात अकरावीच्या एकूण 3 लाख 20 हजार 390 जागा उपलब्ध असून तिसऱ्या प्रवेश फेरीअंती आततापर्यंत केवळ 1 लाख 35 हजार 466 प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. म्हणजेच तिसऱ्या प्रवेश फेरीनंतर आतापर्यंत केवळ 42 टक्के प्रवेशनिश्चिती मुंबई विभागातून होऊ शकली आहे.
विशेष फेरीचे सुधारित वेळापत्रक
26 डिसेंबर सायंकाळी 5 पर्यंत
- SEBC विद्यार्थ्यांनी EWS किंवा जनरल प्रवर्ग निवडणे व अंडरटेकिंग अपलोड करणे. अर्जाचा भाग 1 भरून लॉक करणे व वेरीफाय करून
- घेणे. बदल करावयाचा नसल्यास फॉर्म पार्ट 1 अनलॉक करू नये.
- या कालावधीत इतर विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भाग 1 भरता येईल, त्यामध्ये बदल करता येईल.
- यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करता येईल व विशेष फेरीसाठी लगेच अर्ज सादर करता येईल.
27 डिसेंबर रात्री 11:55 पर्यत
- प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे (भाग 2 भरणे व लॉक करणे)
- यापूर्वी ऑप्शन फॉर्म भरला असल्यास त्यामध्ये बदल करता येईल
28 डिसेंबर 5 वाजता
- गुणवत्ता यादी जाहीर होणार, व कट ऑफ संकेतस्थळवर प्रदर्शित होतील. 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर सायंकाळी 6 पर्यंत. मिळलेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी कालावधी.
1 जानेवारी
- विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांचा तपशील जाहीर होणार.
संबंधित बातमी :
मराठा विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; विनोद पाटील, विनायक मेटे यांची प्रतिक्रिया
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI