![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Educational Qualification Of UK President : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचं शिक्षण नेमकं किती? जाणून घ्या
Educational Qualification Of UK President : ऋषी सुनक यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्यांनी स्ट्रॉउड स्कूल आणि विंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
![Educational Qualification Of UK President : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचं शिक्षण नेमकं किती? जाणून घ्या educational qualification of uk pm rishi sunak and his wife akshata murthy Educational Qualification Of UK President : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचं शिक्षण नेमकं किती? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/13/24af8e1427b9765c0bcd338b181f90691694579695407358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rishi Sunak Education : नुकत्याच झालेल्या G20 बैठकीत (G20 Summit 2023) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. भारताच्या अध्यक्षतेखाली G20 परिषदेत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थैर्य, हवामान बदल आणि इतर अनेक जागतिक आव्हानांवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान सहभागी झाले होते. पण G20 परिषदेत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murthy). ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र. त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं शिक्षण (Education) नेमकं किती याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नसेल, तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं शिक्षण नेमकं किती?
G20 बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. त्यांनी शाळकरी मुलांचीही भेट घेतली. ऋषी सुनक हा भारतीय वंशाचे वैद्य यशवीर सुनक आणि उषा सुनक यांचे चिरंजीव आहेत. त्यांचा जन्म इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथे झाला.
ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या शिक्षणाबद्दल (Education) सांगायचे तर, त्यांनी स्ट्रॉउड स्कूल आणि विंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्याच वेळी, त्यांनी ऑक्सफर्डच्या लिंकन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. 2001 मध्ये त्यांचे पदवीचे (Graduation) शिक्षण पूर्ण झाले. सुनक यांनी तत्त्वज्ञान (Philosophy), अर्थशास्त्र (Economics) आणि राजकारणाचा (Politics) अभ्यास केला आहे. याशिवाय फुलब्राईट स्कॉलर म्हणून त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए (MBA) केले आहे. याच दरम्यान त्यांची भेट अक्षता मूर्ती यांच्याशी झाली.
अक्षता मूर्ती यांचं शिक्षण किती?
अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे (Infosis) संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) आणि सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांच्या कन्या आहेत. त्यांनी बंगळुरूमधील बाल्डविन गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी कॅलिफोर्नियातील क्लेरेमोंट मॅकेन्ना कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. या ठिकाणी त्यांनी अर्थशास्त्र आणि फ्रेंचमध्ये बीए (French BA) केले आहे. याशिवाय त्यांनी अॅपेरल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमाही केला आहे. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे (MBA) शिक्षण घेतले.
महत्त्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)