एक्स्प्लोर

CUET UG 2022 Result : CUET परीक्षेचा निकाल लवकरच लागणार, UGC अध्यक्षांनी सांगितली तारीख

CUET UG 2022 Result : CUET UG परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. UGC अध्यक्षांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. 

CUET UG 2022 Result : CUET UG परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच CUET UG चा निकाल लवकरच लागणार आहे. UGC अध्यक्षांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. 

14 लाख 90 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले 
ही परीक्षा 15 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. यंदा 14 लाख 90 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ही परीक्षा देशातील 259 शहरांमध्ये आणि देशाबाहेरील 09 शहरांमध्ये असलेल्या 489 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सहा टप्प्यांमध्ये कॉमन एंट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (CUET UG Exam) आयोजित केली होती.  

यूजीसी अध्यक्षांचे ट्विट 
विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे, CUET UG 2022 परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. यूजीसी अध्यक्षांनी सांगितले की, CUET यूजीचे निकाल NTA द्वारे 15 सप्टेंबरपर्यंत घोषित करणे अपेक्षित आहे. ते म्हणाले की सर्व सहभागी विद्यापीठांनी CUET UG स्कोअरच्या आधारे यूजी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यांचे वेब पोर्टल तयार ठेवावे.

आक्षेप नोंदवण्याची आज शेवटची संधी
CUET UG 2022 चा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे प्रसिद्ध केला जाईल. या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरावे लागतील. एनटीएने या परीक्षेची तात्पुरती ANSWER KEY जारी केली होती, ज्यावर उमेदवारांना आज आक्षेप नोंदवण्याची शेवटची संधी आहे. आक्षेप निकाली काढल्यानंतर परीक्षेची अंतिम उत्तरे NTA द्वारे प्रसिद्ध केली जातील. NTA कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या/तिच्या आव्हानाच्या स्वीकार/नकाराबद्दल माहिती देणार नाही. तांत्रिक अडचणींमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांची पुनर्परीक्षा 11 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल, याचीही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. CUET परीक्षा 2022 शी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार 011- 40759000 वर कॉल करू शकतात किंवा उमेदवार cuet-ug@nta.ac.in वर ईमेल करू शकतात.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget