CISCE बोर्डाकडून दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जारी, cisce.org वर मिळेल संपूर्ण माहिती
CISCE Board Exam 2023 Datesheet Updates : दहावी आणि बारावीच्या परीक्षाचं वेळापत्रक जारी कऱण्यात आले आहे. CISCE बोर्डाचं अधिकृत संकेतस्थळ cisce.org. यावर विद्यार्थी परीक्षाचं वेळापत्रक पाहू शकतील.
CISCE Board Exam 2023 Datesheet Updates, Download CISCE 2023 Time-Table Live at cisce.org: नवी दिल्लीतील कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) बोर्डानं 2022-23 या शैक्षणिक वर्षातील दहावी (ISC) आणि बारावीच्या (ICSE) परिक्षाचं वेळापत्रक जारी केले आहे. CISCE बोर्डाचं अधिकृत संकेतस्थळ cisce.org. यावर विद्यार्थी परीक्षाचं वेळापत्रक पाहू शकतील. CISCE बोर्डानं जारी केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार 2023 मध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च यादरम्यान होणार आहेत. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 31 मार्च यादरम्यान होणार आहेत.
Board Exams 2023: ICSE, ISC चं वेळापत्रक कसं डाऊनलोड कराल:
स्टेप 1: cisce.org या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
स्टेप 2 : संकेतस्थळाच्या होमपेजवर टाईम टेबल (time table) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 3: पीडीएफ (PDF) फाईल स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये तुम्हाला वेळापत्रक मिळेल.
स्टेप 4: पीडीएफ फाईल डाऊलोड झाल्यानंतर सेव्ह करु शकता.
2021-22 शैक्षणिक वर्षामध्ये बारावीच्या 18 विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक मिळवला होता. CISCE च्या रिपोर्ट्सनुसार 2022 मध्ये 99.38 टक्के विद्यार्थी पास झाले होते. CISCE बोर्डाच्या माहितीनुसार दहामीमध्ये 99.97 टक्के विद्यार्थी पास झाले होते. दहावी आणि बारावीमध्ये गेल्यावर्षी मुलींनी मुलांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. मुलींचं पास होण्याचं प्रमाण जास्त आहे. दरम्यान, CBSE, CISCE बोर्डाने 2021-22 च्या परीक्षेत टर्म 1 आणि टर्म 2 या परीक्षांना समान महत्त्व दिले आहे.
Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) Board Announces Date Sheet For Classes X (ICSE) and XII (ISC) For Year 2023 Examination.#CISCE #DATESHEET pic.twitter.com/dLG7IoRfQW
— Garv ⚡️ (@garv_chorotiya) December 1, 2022
CISCE बोर्डाची वर्षातून एकदाच परीक्षा
कोरोना महामारीमुळे CISCE बोर्डाकडून दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात येत होती. पण आता वर्षातून एकदाच परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच, CISCE बोर्डानं पुन्हा जुन्या पॅटर्नवर येण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून, ISC (ISC Exams 2023) आणि ICSE (ICSE Exams 2023) च्या अंतिम परीक्षा फक्त एकदाच घेतल्या जातील.
ही बातमी देखील वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI